यतवमाळ : यवतमाळच्या करळगाव घाटात वन कायद्यांचे सर्रास उल्लंघन करून सागवान वृक्षांची तोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 


झी २४ तासचा दणका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रकार झी २४ तास ने उघडकीस आणल्यानंतर वन विभागाने वृक्षतोड केल्याप्रकरणी कारवाईचे पाऊल उचलले आहे. यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक प्रदीप राहुरकर यांनी यवतमाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोतीराम आडे आणि करळगावचे वनपाल रविंद्र बकाल यांना निलंबित केले आहे. 


वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष


वनरक्षक घुगे यांच्यावरही कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे यांना देण्यात आल्या आहे. याबाबत झी २४ तास च्या बातमीनंतर आता कारवाईला सुरवात झाली. पण तरी यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष झाले असल्याने होणाऱ्या अंतिम कारवाईकडे वन्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.