Konkan Railway : गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास दीड आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर होणार आहे. किंबहुना काहींचा परतीचा प्रवास सुरूही झाला आहे. अशा सर्वच मंडळींसाठी कोकण रेल्वे पुन्हा एकदा सज्ज झाली असून, प्रवाशांचा परतीचा प्रवास सुकर होण्यासाठी रेल्वे विभागाच्या वतीनं मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेच्या वतीनं पनवेल ते मडगावदरम्यान अतिरिक्त दोन गणशोत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची रेल्वे गाड्यांची मागणी आणि त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेनं जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गाडी क्रमांक 01428 ही विशेष रेल्वेगाडी १५ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला ती त्याच दिवशी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी पोहोचणार आहे. 01427 ही गाडी 15 सप्टेंबरला पनवेलहून रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून, मडगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता पोहोचणार आहे. 


कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार ही विशेष गाडी? 


गणेशोत्सवानिमित्तच्या या रेल्वेगाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी अशा स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : गौराईच्या आगमनासाठी पावसाची हजेरी; पाहा कोकणापासून विदर्भापर्यंतचा हवामानाचा अंदाज 


कशी आहे डब्यांची व्यवस्था? 


कोकण रेल्वेच्या या जादा गाडीला तीन तृतीय वातानुकूलित डबे, एक द्वितीय वातानुकूलित डबा, दोन तृतीय इकोनॉमी वातानुकूलित डबे, आठ शयनयान अर्थात स्लीपर, पाच सामान्य द्वितीय अशी व्यवस्था असेल. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या रेल्वेसाठीचं आरक्षण आणि सर्व माहिती आरक्षण केंद्रांसह (IRCTC) आयआरसीटीसी या संकेस्थळावर च्या संकेतस्थळावर 10 सप्टेंबरपासून उपलब्ध असेल. त्यामुळं आता परतीच्या प्रवासाची चिंता नको...