धुळे : धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेश सोहळ्यात शहरातल्या कुख्यात गुंडाला प्रवेश देण्यात आला. पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी संशयित आणि अनेक गुन्हे दाखल असलेल्या देवा सोनारला भाजपत प्रवेश देण्यात आला. यावेळी इतरही काही गुन्हे दाखल असलेले कार्यकर्तेही भाजपामय झाले. विशेष म्हणजे सोनारवर पोलिसांवरच हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावसाहेब दानवे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्याधी धुळे आणि जळगावमध्ये भाजपच्या 2 गटामध्ये राडा झाला.


एकनाथ खडसे यांना मंत्रीमंडळात कधी घेणार अशी विचारणा, एकनाथ खडसे यांच्या समर्थकांकडून करण्यात आली. यावेळी दानवे यांनी खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत.


मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्यांना नक्कीच स्थान दिलं जाईल, असं सांगून वेळ मारुन नेली. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.