दिवसा शाळा, संध्याकाळी शाळेच्या मैदानातच गौतमी पाटीलचा डान्स, गावकऱ्यांनी मोफत लुटला आनंद
Gautami Patil Dance in School Ground: दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमीच्या डान्ससाठी स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी ही तयारी करण्यात आली होती. यामुळे आता उलटसुलुट चर्चा रंगू लागल्या आहेत. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Gautami Patil Dance: गौतमी पाटील आणि तिचे नृत्य हे नेहमीच चर्चेचा विषय बनले आहे. गौतमी पाटीलचा डान्स असला की चर्चा होते. मग कधी डान्सवरुन तर कधी आयोजनावरुन चर्चा रंगू लागतात. नृत्यांगना गौतमी पाटीलचा डान्स पुन्हा एकदा नाशिकच्या मैदानात पाहायला मिळाला. मात्र हे मैदान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच मैदान होतं. दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमीच्या डान्ससाठी स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी ही तयारी करण्यात आली होती. यामुळे आता उलटसुलुट चर्चा रंगू लागल्या आहेत. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत दिवसा विद्यार्थी शिक्षण घेत असतात. दिवसा चालणाऱ्या या शाळेत संध्याकाळी मात्र डीजे चे मोठमोठे स्पीकर्स सुरु होते. या स्पिकर्सवर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नृत्य करत होती. गौतमीच्या नृत्याने परिसरातील तरुणांची मने भिजवली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. विविध मद्याच्या ब्रँड साठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे. गौतमीचा महाराष्ट्रातील प्रत्येक नाच गाण्याचा कार्यक्रम हा नेहमीच वादग्रस्त ठरतो.
कधी तरुणांची दांडगाई, मारामाऱ्या तर कुठे गोंधळामुळे नेहमी चर्चेत असतो. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि नाशिक शहरातील दोन्ही कार्यक्रम गोंधळ आणि पत्रकारांना झालेल्या मारहाणीमुळे चांगल्याच चर्चेत आले होते. तिच्या तिसऱ्या कार्यक्रमाच आयोजन चक्क विद्येच्या दारात केल्याने शांततेत झालं, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान गौतमी पाटीलने आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.