धक्कादायक! पुण्यात तरूणीला जाळून हत्या
पुणे शहरात तरूणीची हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
पुणे : पुणे शहरात तरूणीची हत्या झाल्याचं समोर आलं आहे, ही मुलगी २५ वर्षाची असल्याचं सांगण्यात येत आहे, या तरूणीला जाळून ठार मारण्यात आल्याची ही धक्कादायक घटना आहे. ही घटना लोहगाव येथील आहे. या तरूणीचा मृतदेह ८० टक्के जळालेला आहे. या तरूणीच्या हातावर अयोध्या असं नाव गोंदण्यात आलं आहे. वरील फोटोत तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तिच्या उजव्या हातावर अयोध्या लिहिलेला टॅटू आहे. पोलिसांनी तरूणीच्या हातावर गोंधलेल्या नावावरून या तरूणीची ओळख पटवली असल्याचं, पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. ही तरूणी विद्यार्थी आहे की एखाद्या कंपनीची कर्मचारी हे अजून स्पष्ट झालेलं नाही. अनैतिक संबंधातून हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे, मात्र संपूर्ण तपासानंतर योग्य ती माहिती समोर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.