Gold Price Today On 15 July: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार दिसत असल्याचे चित्र आहे. कमोडिटी बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज मौल्यवान धातुच्या दरात घट झाली आहे. भारतीय वायदे बाजारात आज सोनं 11 टक्क्यांनी घसरले आहे.  24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 73,640 रुपये इतकी आहे. आज 110 रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. चांदीदेखील 140 रुपयांनी घसरून 92,968 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात यूएस फेडकडून व्याजदरात कपात होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. या आठवड्यात फेड ऑफिशियल्सकडून याबाबत अधिकृत माहिती येण्याची शक्यता आहे. त्याआधीच सोन्याच्या दरात किचिंतशी घट झाल्याचे पाहायला मिळते. यूएस स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी घट होऊन 2,409 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहेत. यूएस गोल्ड फ्युचर 0.2 टक्क्यांनी घट होऊन 2,414 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाल्याने त्याचा परिणाम भारतातदेखील झाला आहे. 


आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली आहे. आज सोन्याचे भाव 73,640 रुपयांवर स्थिर झाले आहेत. सकाळी MCX वर सोन्याचे भाव घसरले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरातही 100 रुपयांची घट झाली आहे. आज 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 67,500 रुपये इतके आहे. 


असा आहे सोन्याचे दर


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   67, 500 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   73,640 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   55,230 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,750 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,364 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,523  रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   54, 000 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58, 912  रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    44, 184  रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-  67, 500 रुपये
24 कॅरेट-  73,640 रुपये
18 कॅरेट- 55,230 रुपये