Gold Price Today News in Marathi : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या शेवटीपासून सोन्याच्या किंमतीत जी दरवाढ सुरु झाली आहे ती दरवाढ थांबायचं नाव घेतच नाही. तर दुसरीकडे एप्रिल, मे महिना हा लग्नसराईचा काळ असतो. अशावेळी सोन्याच्या दागिन्यांना प्रचंड मागणी असते. मात्र सोन्याची वाढती दरवाढ पाहून आता ग्राहकांनी देखील पाठ फिरवली आहे. 1947 मध्ये हेच सोने 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात होते, तेच सोनं आता 2024 मध्ये 69,500 रुपयांवर पोहचले आहे. म्हणजेच तेव्हापासून आतापर्यंत त्याची किंमत 784 पटीने वाढली आहे. तर चांदीचा भाव 107 रुपये किलो होता, तो आता 76 हजार रुपयांच्या वर गेला आहे.


सोन्याच्या दरात वाढ का होते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचे संकेत दिल्यामुळे सोन्याने जागतिक स्तरावर उच्चांक गाठला असून भारतातच त्याचे पडसाद उमटत आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याने नवा उच्चांक गाठला असून सोनं 70 हजार रुपयांच्या पातळीजवळ पोहोचले आहे. मुंबईच्या सराफा बाजारात बुधवारी 24 कॅरेट सोन्याची विक्री किंमत 69,870 रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) होती. मंगळवारच्या तुलनेत त्यात 760 रुपयांची वाढ झाली. 99.5 टक्के शुद्धतेचा मानक सोन्याचा बुधवारी झवेरी बाजारात 69,090 रुपयांना विकले जात आहे. एकंदरीत भविष्यात हेच सोनं 75 हजारांवर पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


आर्थिक वर्षात सोन्याच्या दरात वाढ 


गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सोनं प्रति दहा ग्रॅम 61 हजार रुपयांच्या पातळी जवळ होते. त्यानंतर सोन्यात वर्षभरात जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे विविध काळात परिणाम झाले. दरम्यान मंगळवारी, 2 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 550 रुपयांनी वाढला त्यानंतर 3 एप्रिलला सोन्याचा भाव पुन्हा 500 रुपयांनी वाढून 69 हजार 500 रुपये प्रति तोळा झाला. त्यामुळे एक तोळा सोन्यासाठी जीएसटीसह 71 हजार 585 रुपये मोजावे लागणार आहेत.  तर चांदीचा भाव 76 हजार रुपये किलोवर स्थिर आहे.


सोन्यासह चांदीच्या ही दरात वाढ


एकेकडे सोन्याच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे चांदीच्या ही दरात वाढ होत आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदीचे दर 1 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. MCX वर सध्याचा चांदीचा भाव 76,000 रुपये प्रति किलो आहे.