`मराठा आरक्षणाचा अहवाल एखाद्या कार्यकर्त्याने लिहिल्यासारखाच!` गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी यावर टीका केली आहे.
Gunaratna Sadavarte Critisis Maratha reservation Bill: मराठा आरक्षण विधेयकासाठी आज एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात मांडले. ते एकमताने मंजूर झाले. यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप नोंदवला. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील या निर्णयावर टीका केली आहे. तसेच सदावर्ते यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
मराठा आरक्षणाचा अहवाल एखाद्या कार्यकर्त्याने लिहिल्यासारखाच!, असल्याचे विधान गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. निवृत्त न्यायमुर्ती शुक्रे हे मराठा आरक्षण चळवळीचे निवृत्तीनंतर कार्यकर्ते होते. त्यानंतर त्यांना संविधानिक पद बहाल करण्यात आले. त्यांनी लिहिलेला रिपोर्ट हा कार्यकर्त्याने लिहिल्यासारखा आहे, असे सदावर्ते म्हणाले.
रिपोर्टचं महत्व त्यापेक्षा जास्त असू शकत नाही. तोच रिपोर्ट कॅबिनेटने स्वीकारला. कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयाचा मी निषेध करतो, असेही ते पुढे म्हणाले.
'दहा हजारच्या 2 माळा लावा, असा जल्लोष करा की उद्धव साहेबांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत'
खुल्या प्रवर्गात गुणवंतांच्या जागा असतात, त्या त्यांना सातासमुद्रापार घेऊन जातात. या 10 टक्के जागांवर चुकीच्या निष्कर्षाच्या आधारे कत्तल करण्यात आल्याचे ते म्हणाले.
गुणरत्न सदावर्ते यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आरक्षणाविरोधात त्यांनी याचिका दाखल केली.
मराठा आरक्षण निर्णयानंतर विधानसभेत गोंधळ...भुजबळांचा आक्रोश, 'जे जरांगे मला धमक्या देतात...'
जरांगेवर टीकास्त्र
मनोज जरांगे पाटलांचे बोलणे मग्रुरीचे असते. भाषणातून त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडते. एखाद्या जात समुह म्हणून गलिच्छ राजकारण सुरु असल्याची टीका त्यांनी गुणरत्न सदावर्तेवर केली होती. जरांगेंची सभा विराट नसते. या सभेपेक्षा यात्रा मोठ्या होतात. एक मराठा लाख मराठा ही घोषणा सीमेवरील सैन्याची आहे, ती समाजाची नाही. आरक्षण मागणीवर नाही तर परिस्थितीवर असतं, असेही सदावर्ते म्हणाले होते. जरांगे यांनी देखील वेळोवेळी सदावर्तेंना पलटवार केला आहे.