Ghodbunder Thane Traffic:  ठाणेकरांसाठी (Thane News) महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ठाणे शहर आणि मुंबई अहमदाबाद महामार्गाला (Mumbai Ahmedabad Highway) जोडणाऱ्या घोडबंदर रोडबाबत (Ghodbandar Road) मोठी अपडेटसमोर आली आहे. 18 जुलैपर्यंत घोडबंदर रोड अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. वडाळा-ठाणे-कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या कामादरम्यान मानपाडा ते कापूरबावडी येथे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. या बांधकामामुळं घोडबंदर रोडवर ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने अवजड वाहनांना बंदी घातली आहे. (Ghodbunder Thane Traffic Update)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18 जुलैपर्यंत रात्री 11.55 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे. त्यामुळं या वेळेत अवजड वाहनांना या मार्गावर प्रवास करता येणार नाहीये. अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागणार आहे. या मार्गावरुन दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळं प्रवेशबंदीच्या काळात अवजड वाहने कापूरबावडी येथून भिवंडी, कशेळीमधून वळवण्यात आली आहेत. 


मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करत ही वाहने गॅमनमार्गे खारेगाव खाडी पुलाखालून खारेगाव टोलनाका माणकोली अंजूर फाटामार्गे मार्गस्थ केली जाणार आहेत. ठाणे वाहतूक विभागाने ही महत्त्वाची माहिती दिली आहे. 


गुजरातमधून घोडबंदरमार्गे उरण-जेएमपीटीकडे जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून घोडबंदर मार्गावर वडाळा- घाटकोपर कासारवडवली या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्याच कामाचा एक भाग म्हणून मानपाडा ते कापूरबावडीपर्यंत बीम उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळं या काळात अपघात टाळण्यासाठी या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


वर्सोवा पुल सुरू होणार 


दरम्यान, घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी आता सुटणार, सोमवारी वर्सोवा पुलावरील दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळं वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील जुना पूल मुंबई, वसई-विरार ते पुढे गुजरात व ठाणे या शहरांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या पुलाला पर्याय म्हणून नवीन चार पदरी पूल उभारण्याचे काम २०१९मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रत्यक्षात हाती घेण्यात आले होते.