अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची उद्या मुंबईमध्ये भव्य सभा आहे. परंतु, या सभेच्या एक दिवस आधी आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी पुन्हा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही हनुमान चालीसा पठण केले त्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकले जाते. पण, अकबरुद्दीन ओवैसी महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये येऊन औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहतात. ते मुख्यमंत्री यांना चालते का? असा सवाल आमदार रवी राणा यांनी केला आहे.


देशातील प्रत्येक हिंदूंचा उद्धव ठाकरे यांना हा सवाल आहे. उद्या मुख्यमंत्री सभेची सुरुवात करताना हनुमान चालीसा म्हणणार आहेत की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहायला जाणार आहे असा थेट सवालही आमदार रवी राणा यांनी केला आहे.