अहमदनगर : हरिश्चंद्र गडाहून माकडनाळ या रॉकवर चढाई करताना अरूण सावंत या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळीच अरूण सावंत यांच्यासह ३० जणांचं युनिट ट्रेकिंगसाठी गेलं होतं. त्यावेळी कोकणकड्याहून आडवा रोप बोल्ड करायच्या प्रयत्नात सावंत असतानाचं ते  ५५० फूट खोल दरीत पडले, खडकांवर आदळले आणि त्यांचा जागीच त्यांचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांचा मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत आहे. विशेष म्हणजे सावंत ३० जणांच्या या टीमला लीड करत होते. महाराष्ट्रातले सर्वात अनुभवी ट्रेकर असणाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते. या वृत्तनांतर राज्यभरातील हजारो गिर्यारोहकांमधून दु:ख व्यक्त केले जात आहे. 



ध्येयवेडे गिर्यारोहक अरुण सावंत यांचा गिर्यारोहण करताना झालेला अपघाती मृत्यू धक्कादायक आणि क्लेशदायक असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. गिर्यारोहण लोकप्रिय करण्यात त्यांचं  योगदान सदैव लक्षात राहील. सह्याद्रीचा हा सुपुत्र आज अखेर सह्याद्रीच्या कुशीतच विसावला.


सह्याद्रीच्या डोंगरकपारीत फिरणारा हा फिरस्ता आज अखेरच्या प्रवासाला चालला आहे. यासारखे दुःख नाही. अरुण सावंत अनेक गिर्यारोहकांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान होते. या शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी अरुण सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.