अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती ​ : भाजपने आधी त्यांच्याच पक्षातील लोकांना संस्कार शिकवावे. आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाड फोडली नाहीत. यांचे कित्येक लोक कित्येक प्रकरणात सापडतात. कुणाची सीडी बाहेर निघते तर आणखी कुणाचे काही. आम्हा महिलांनी कस राहायचं हे अजिबात शिकवू नये अशी टीका करत उत्तर प्रदेश मधील भाजपच्या त्या मुक्ताफळे उधळणाऱ्या आमदाराला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुनावलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलींवर योग्य संस्कार होत नसल्याने मुलींवर बलात्कार होतात. अशा घटनाना सरकार आणि तलवारीने रोखणं अशक्य आहे अशी मुक्ताफळं भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी हाथरस प्रकरणावर उधळली होती. त्यांवर यशोमती ठाकूर यांनीही जोरदार टीका केली आहे.


उत्तर प्रदेश मधील हाथरस मधील बलात्कार प्रकरणी देशभरात संतापाची लाट असताच भाजपचे स्थानिक आमदार सुरेंद्र सिंह यांनी काल या प्रकरनावर मुक्ताफळे उधळली आहे. सरकार आणि तलवार अत्याचार रोखू शकत नाही. आई वडिलांनी आपल्या तरुण मुलीला संस्कारी वातावरणात राहण्याची पद्धत शिकवायला हवी अशी मुक्ताफळे सुरेंद्र सिंह यांनी उधळली आहे.


एवढंच नाही तर हाथरस मध्ये अत्याचार झालाच नव्हता शवविच्छेदनातून त्याला दुजोरा मिळाला आहे असेही सिंह म्हणाले होते त्यामुळे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांच्या वर देशभरातून टीका होत आहे. या वाचाळवीर आमदारावर टीका करताना मंत्री ठाकूर म्हणाल्या आमच्यावर संस्कार आहेत म्हणुन आम्ही सावित्री बनलो.रमाबाई बनलो या देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी बनल्या. पहिल्या राष्ट्रपती या माझ्या अमरावती जिल्ह्यातील आहे.


आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाड फोडली नाहीत. आमचा संयम आमची कमजोरी समजू नका कोणतीही महिला कमजोर नसते. वेळ आली की ती दुर्गेच रूप धारण करू शकते. त्यामुळे खरी शिकवण महिलसोबत पुरुषांना देखील देन गरजेच आहे. अस यशोमती ठाकुर म्हणाल्या आहे.