Heat Wave In Konkan : देशभरात चांगलाच जोर धरलेली (Winter) थंडी आता कुठच्याकुठे पळालेली दिसत असून, देशाच्या बहुतांश भागामध्ये सूर्यानं आग ओकण्यास सुरुवात केली आहे. (Maharashtra temprature) महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळक आहे. या धर्तीवर हवामान विभागानंही राज्यातील तापमानाबाबत महत्त्वाचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं आहे. यामध्ये विशेषत: (Konkan) कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. 


'या' वेळेत घराबाहेर पडूच नका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात तापमान काही अंशांनी वाढू शकतं. शिवाय कोकण किनारपट्टी भागातही उष्णतेचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढणार आहे. ज्यामुळं तापमानाचा आकडा 37 ते 39 अंशावर असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. थोडक्यात पुढील दोन दिवसांत कोकण किनारपट्टीला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसेल.


हेसुद्धा वाचा : Weather Update : उन्हाच्या झळा आणखी वाढणार


 


परिणामस्वरुप या भागातील नागरिकांनी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत घराबाहेर पडू नये असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. (Goa temprature) गोव्यापर्यंत ही उष्णतेची लाट जाणवणार असून, साधारण तीन दिवसांनंतरच तापमानात काहीशी घट दिसून येईल. 


कोकणाला उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बसणार फटका... 


राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उन्हाळ्याची सुरुवात कोकणवासियांना काहीशी महागात पडताना दिसणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील इतर भागाच्या तुलनेत कोकणात उष्णतेची लाट अधिक तीव्र असेल. रत्नागिरी आणि सदरील पट्ट्यामध्ये या Heatwave चा जास्त परिणाम दिसेल. त्याचे थेट परिणाम मुंबई, रायगड भागात दिसून येतील. तिथे गुजरातमधील कच्छ येथेही तापमानात लक्षणीय वाढ पाहायला मिळणार आहे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


उष्णता वाढत असताना तुम्ही कशी काळजी घ्याल? 


एकिकडे उन्हाचा तडाखा वाढत असतानाच दुसरीकडे आरोग्याची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं असेल. त्यामुळं उष्माघातानं प्रभावित न होण्यासाठी खालील सोपे उपाय नक्की अवलंबात आणा.... 


  • शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल राखा. थोड्याथोड्या वेळानं पाणी प्या. 

  • उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबू सरबत, नारळ पाणी, ताक तत्सम पाण्याचा अधिक अंश असणाऱ्या पदार्थांना प्राधान्य द्या. 

  • कलिंगड, संत्र, मोसंबी, द्राक्ष ही फळं खा. 

  • फ्रिजमधील पाण्याऐवजी माठातील पाणी प्या. 

  • आहारात काकडीचा समावेश करा 

  • डोळ्यांवर गॉगल, डोक्यावर टोरी किंवा स्कार्फ गुंडाळा.  

  • उन्हात जाताना पूर्ण बाह्यांचे हलके सूती कपडे वापरा. गडद रंगाचे कपडे टाळा