सातारा : कोयना धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे  धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना प्रशासनाने धरणाचे ६ वक्र दरवाजे ५ फुटांवरून ६ फूट  उचलून ५१,२८५ क्यूसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडायला सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर धरणाच्या पायथा वीज गृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू केला आहे. त्यामुळे एकूण ५३,३८५ क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे. त्यामुळे कोयना नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.