Loksabha Election 2024 :  महायुतीमधुल जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कोणाला कोणत्या जागा मिळणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. अशातच शिंदे गटाने लोकसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर केला आहे. खसादार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गटाच्या पहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. नाशिक मधून हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचंय, दुस-या कोणाचं नाव नसल्याचं श्रीकांत शिंदेनी म्हंटल आहे. महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार आणायचे आहेत. त्यात गोडसेसुद्धा असतील असं विधान श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. आता भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असेल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागल आहे. 


उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजप केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी  मिळणार?


उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजप केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी देणार अशी सूत्रांची माहिती आहे. उत्तर मुंबई मतदार संघात भाजपचे गोपाळ शेट्टी हे दोन टर्म खासदार आहेत. मात्र यावेळी त्यांचं तिकीट कापलं जाणार असं बोललं जातंय. त्यांच्याऐवजी पियूष गोयल यांचं नाव भाजपकडून आघाडीवर आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात बिगर मराठी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 


सुधीर मुनंगटीवार, संदीपान भुमरेंना लोकसभा लढवण्याचे आदेश


भाजप नेते सुधीर मुनंगटीवार आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांना लोकसभा लढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून लढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, संदीपान भुमरेंना संभाजीनगरमधून लढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  मुनगंटीवार, भुमरे लोकसभा लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सुधीर  मुनगंटीवारांनी मात्र दिल्लीला जाण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे.


महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला तयार


दरम्यान, राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला तयार झाला आहे.  भाजपला 31, शिवसेनेला 13 तर राष्ट्रवादीला 4 जागा मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 13 जागा मिळणार आहेत. तर, राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरुर, परभणीची जागा मिळण्याची शक्यता आहे. 


मनसेही यंदा लोकसभेच्या रिंगणात?


पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी अखेर राज ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. साहेब मला माफ करा अशी फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेचा राजीनामा दिलाय.  वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्या अनुषंघाने त्यांनी तयारीही सुरू केलीय. 


मनसेही यंदा लोकसभेच्या रिंगणात असणार का, याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. येत्या ३ ते ४ दिवसातात निवडणूक लढायची की नाही याबाबत राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आढावा बैठक घेतली. तुम्ही लोकांपर्यंत संपर्क वाढवा असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.