ना मंत्रालय, ना वशिला; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविण्यासाठी थेट करा अर्ज!
Application For CM Relief Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे.
Chief Minister's Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक गोरगरिबांसाठी मदतीचा हात ठरताना दिसतोय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविलं आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळालं आहे. गोरगरीब आणि गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केलं जातं. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या 14 महिन्यात 13, 000 पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केल्याची माहिती समोर आली आहे.
कसा कराल अर्ज?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीन मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. त्याचबरोबर आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणं आणखी सोपं झालंय. निधीसाठी आता मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही, CMMRF अँप्लिकेशन वरून अर्ज भरू शकता आणि मदत मिळवू शकता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला होता. त्यानंतर मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात 178 रुग्णांना 76 लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती विशेष कार्य अधिकारी मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. यंदाच्या ऑगस्टमध्ये विक्रमी 1567 रुग्णांना 13 कोटी 14 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तसेच एप्रिलमध्ये 1190 रुग्णांना 9 कोटी 91 लाख रुपयांची सहाय्यता करण्यात आली आहे.
इथे करा अर्ज > क्लिक करा
दरम्यान, मंगेश चिवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया, या आजारांचा समावेश मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये करण्यात आला समावेश आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन देखील मंगेश चिवटे यांनी केलंय.