IIT Bombay MMS Scandal: पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील MMS Scandal वाद थंड होत असतानाच आता IIT Bombay मधील धक्कादायक घटना समोर आली आहे. आयआयटी बॉम्बेमध्येही एका विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडीओ बनवल्याची घटना समोर आली. आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा संपुर्ण प्रकार समोर आला. रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये तिचा अश्लिल व्हिडीओ बनवला होता.  (IIT Bombay employee arrested for peeping into womens bathroom)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय झालं?


IIT Bombay मध्ये शिकणारी विद्यार्थीनी रविवारी रात्री बाथरूममध्ये गेली असताना कँटीनमध्ये काम करणाऱ्या पिंटू गरिया नावाचा कर्मचारी खिडकीमधून डोकावत होता. त्यावेळी त्याने व्हिडीओ देखील बनवल्याचा आरोप आहे. आयआयटी बॉम्बेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. आरोपी पिंटू पाईपवर चढून बाथरूममध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत होता.


सध्या आरोपी पिंटू पोलिसांच्या ताब्यात असून मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रकरणानंतर आयआयटी बॉम्बेने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.


IIT Bombay कडून निवेदन जारी -


आयआयटीच्या वसतिगृहातील नाईट कँटीनमध्ये काम करणारा कर्मचारी विद्यार्थीच्या बाथरूमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर कँटीन देखील तात्काळ बंद करण्यात आल्याची माहिती IIT Bombayने दिली आहे.


आरोपी पिंटूने ज्या पाईपचा वापर केला, तो परिसर सध्या ब्लॉक करण्यात आलाय. आयआयटी मुंबई आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत. आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे, ते सर्व आम्ही करू, असं आश्वासन देखील  IIT Bombayने दिलं आहे.


विद्यापीठातील परिसरात मुली सुरक्षित ???


नुकतंच, मोहालीमध्ये चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थींनीचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. एका तरुणीनेच मुलींचे व्हिडीओ व्हायरल केले होते. त्यानंतर आता आयआयटी बॉम्बेमध्ये घडलेल्या या घटनेमुळे विद्यापीठातील परिसरात मुली सुरक्षित आहेत का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.