चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील थरारक व्हिडिओ. पट्टेदार वाघाच्या तावडीतून कशी झाली दोन बाईकस्वारांची सुटका..? झी २४ तासचा EXCLUSIVE रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन पट्टेदार वाघ आणि त्यांच्या तावडीत सापडलेले दोन बाइकस्वार. चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या त्या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात गाजतोय.  झी  २४तासनं देखील काही दिवसांपूर्वी ती क्लीप दाखवली होती. मात्र त्यावेळी त्या दोघा बाइकस्वारांची वाघांच्या पर्यायानं मृत्यूच्या फेऱ्यातून नेमकी कशी सुटका झाली, याची माहिती आज पहिल्यांदाच आम्ही उघड करणार आहोत.


बाइकवर बसलेले दोघेही व्याघ्र प्रकल्पात बीट गार्ड म्हणून कामाला आहेत. गेल्या २८ डिसेंबरला संध्याकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास जामनी परिसरात ही घटना घडली. जामनीकडून मोहुर्ली गेटकडे परतत असताना दोन पट्टेदार वाघांनी त्यांना घेरलं. एक समोर तर एक मागे होता. प्रसंगावधान राखत त्या दोघा बीट गार्डनी बाइक जागीच थांबवली आणि वाघ जाण्याची वाट बघत ते बसले.


पण वाघ त्यांच्याभोवतीच घिरट्या घालत असल्यानं त्यांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, त्या दोघांची मृत्यूच्या जबड्यातून आपली सुटका करुन घेतली.  थरारक अनुभव वन संरक्षक मुकुल त्रिवेदी यांनी सांगितली.