IND vs ENG : विराटवर कॅप्टन रोहित मेहरबान, पण कोच राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं, 'रिक्स घेऊन खेळाल तर...'

Rahul Dravid on Virat Kohli : टीम इंडियाचा किंग म्हणजेच विराट कोहली याला सुर गवसेना झालाय. त्यावर आता राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.

| Jun 28, 2024, 17:27 PM IST

Rahul Dravid Talk On Virat Kohli : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने फायनल गाठली आहे. अशातच आता टीम इंडियाला चिंता सतावतेय ती विराट कोहलीच्या फॉर्मची...

1/7

विराट कोहली

विराट कोहली याला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता कोहलीवर टीका होताना दिसते. अशातच रोहित शर्माने विराटची पाठराखण केलीये.

2/7

केवळ 75 धावा

विराट कोहलीला वर्ल्ड कपमधील 7 सामन्यामध्ये केवळ 75 धावा करता आल्या आहेत. त्यावर आता हेड कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.

3/7

गडबड होऊ शकते

तुम्हाला विराट माहिती आहे. तो काय करु शकतो, हे सर्वांना माहिती आहे. कधी तुम्ही रिस्क घेऊन खेळायला जाता, तेव्हा अशी गडबड होऊ शकते, असं राहुल द्रविड म्हणाले.  

4/7

टेम्पो सेट

आज देखील तुम्ही पाहिलं तर विराटने सिक्स मारून एक चांगला टेम्पो सेट केला होता. मात्र, नंतरच्या बॉलवर तो अनलकी ठरला, असं म्हणत द्रविडने विराटची पाठराखण केली.

5/7

चांगलं उदाहरण

विराट ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो, ते नक्कीच मला आवडतं. तो संघासाठी एक चांगलं उदाहरण सेट करण्याचा प्रयत्न करतोय, असंही विराटने म्हटलं आहे.

6/7

मोठी खेळी खेळणार

मला वाटतं की त्याच्या बॅटमधून लवकरच मोठी खेळी होणार आहे. मला त्याच्या खेळण्याचा अंदाज आवडला, असंही हेड कोच द्रविड म्हणतात.

7/7

तो डिजर्व करतो..

मैदानावर त्याचा जो तोरा असतो, त्यामुळे नक्कीच संघाला स्पृर्ती मिळते. आणि तो डिजर्व करतो, असंही राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.