महाराष्ट्राला जोडणारा भारतातील पहिला इलेक्ट्रिक हाईवे; ट्रेन प्रमाणे विजेच्या करंटवर धावणार वाहने
Electric Highway: जर्मनी आणि स्वीडन प्रमाणे भारतातही इलेक्ट्रीक हायवे उभारला जात आहे. या हायवे महाराष्ट्राला जोडणारा आहे.
Delhi Mumbai Expressway, Electric Highway : भारताच्या कानाकोपऱ्यात महामार्गांचे जाळे तयार केले जात आहे. देशात अनेक महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. भारतात इलेक्ट्रिक हाईवे उभारला जात आहे. महाराष्ट्रातून स्टार्ट होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या महामार्ग असलेल्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरच भारतातील हा पहिला इलेक्ट्रिक हाईवे तयार केला जाणार आहे. या इलेक्ट्रिक हायवेमुळे पेट्रोल डिझेलची कटकट संपणार असून सर्व वाहने वीजेवर धावणार आहेत. तसेच धावता धावता ही वाहने चार्ज होणार आहेत.
हे देखील वाचा... पृथ्वीच्या पोटात सापडला सर्वात पावरफुल खजिना! पुढच्या 200 वर्षांची चिंता मिटली
1350 किमी लांबीच्या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा काही भाग इलेक्ट्रिक एक्सप्रेस वेच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे. 6 राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे वेळेची बचत होणार असून प्रवास देखील सुपरफास्ट होणार आहे. भविष्यात महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची पेट्रोल, डिझेलच्या कटकटीतून सुटका होणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत आहे. यामुळे भविष्यात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास मार्गिका तयार केली जात आहे. या महामार्गावरुन ट्रॉलीबस, ट्रक इत्यादी वाहने धावतील. या महामार्गावर वाहने धावता धावताच चार्ज होणार आहेत. म्हणजेच या महामार्गावर ट्रेनप्रमाणे विजेवर वाहने धावणार आहेत.
ई-हायवेच्या निर्मितीमुळे डिझेल आणि पेट्रोलऐवजी विजेचा वापर होणार आहे. यामुळे लॉजिस्टिक खर्च 70 टक्क्यांनी कमी होईल असा दावा केला जात आहे. 8 लेन एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक लेन इलेक्ट्रिक वाहनांसाठी असणार आहे. सेफ्टीसाठी या इलेक्ट्रिक हाईवेच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटर उंचीचे अडथळे उभारण्यात येणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी या इलेक्ट्रिक हाईवेची घोषणा केली होती. सध्या जर्मनी आणि स्वीडन या दोन देशांमध्ये इलेक्ट्रिक हाईवे आहेत. असाच इलेक्ट्रिक हाईवे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर उभारला जाणार आहे. या महामार्गावरील दिल्ली ते जयपुर दरम्यान हा इलेक्ट्रिक हाईवे उभारला जाणार आहे.