अहमदनगर : हभप किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एका किर्तनात त्यांनी समतिथीला स्त्रीयांशी संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तिथीला संबंध ठेवल्यास मुलगी होते असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यान इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक लोकं पुढे आले आहेत. त्यांच्यासाठी आंदोलन करण्याची चाहत्यांनी तयारी सुरू केली असता महाराजांकडून आवाहन करण्यात आले आहे. 'आपल्यासाठी कुणीही मोर्चे… आंदोलनं करू नये' असं आवाहन इंदुरीकरांनी पत्रकाद्वारे केलं आहे. या पार्श्वभुमीवर इंदुरीकर महाराजांनी आपल्या समर्थकांना पत्रामार्फत संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. न्यायाच्या मार्गाने जाणार असल्याचे त्यांनी या पत्रातून स्पष्ट केले आहे. 



दुरीकर महाराजांचं विधान चुकीचं असून त्याच समर्थन करत नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. इंदुरीकर समाज प्रबोधनाच काम करतात. मी त्यांच्या अनेक किर्तनाला गेलोय. ते अनेक सामाजिक विषय हाताळतात. त्यांच महिलांविषयीचं विधान चुकीचं आहे. त्याच समर्थन होऊ शकत नाही. पण एका विधानानं माणूस चुकीचा होत नाही. इंदुरीकर महाराजांच्या विधानाचे समर्थन करत नसल्याचे ते म्हणाले. 



इंदुरीकर महाराजांनी महिलांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्माण समिती आक्रमक झाली आहे. दरम्यान इंदुरीकर महाराजांविरोधात तक्रार दाखल अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तक्रार दाखल केली आहे.