मुंबई : Uddhav Thackeray camp says Shiv Sena rebels will be disqualified :16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. दरम्यान, शिवसेनेने न्यायालयातआपली बाजू मांडलीच नाही, अशी माहिती पुढे आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या 16 आमदार अपात्रता याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरु केलेल्या आमदारांच्या अपात्रता कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत व्हीप धुडकावल्याबद्दल दोन्ही बाजूंनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी आज सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे.


 दरम्यान, बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्यात आलेल्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे यांची सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच शिवसेनेच्या बंडखोरांना अपात्र ठरवले जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  यांचे म्हणणे आहे.


मुंबईतील शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती आणि उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यालाही बंडखोर गटाने आव्हान दिले आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यासोबत बंडखोरांचा सामना करण्याची तयारी केली असून, पक्षाने 16 बंडखोर आमदारांना नोटीस बजावून त्यांना अपात्र ठरवण्याची कायदेशीर कारवाई आधीच सुरु केली.


विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरू केलेल्या आमदारांच्या अपात्रता कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत व्हीप धुडकावल्याबद्दल दोन्ही बाजूंनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी आज सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. 



न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांचाही खंडपीठात समावेश आहे. तर ओबीसी प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती खानविलकर यांच्या कोर्टापुढे होणार आहे. राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, याचा फैसला आजच होण्याची शक्यता आहे.