Inflation in Maharashtra: मेघा कुचिक  / राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका धान्य उत्पादनाला बसला आहे. ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्यांच्या किंमती कडाडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्वारीचे दर 22 ते 29 रुपयांवरुन थेट 28 ते 50 रुपयांवर गेलेत. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरीने पन्नाशी ओलांडली आहे. उडीदडाळ, मुगडाळ, तूरडाळ होलसेल मार्केटमध्येच शंभरी पार गेली आहे.  त्यामुळे सर्वसामान्य महिलांच्या किचनच बजेट बिघडलं आहे. अवकाळी पावसामुळे धान्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. 


गहू, ज्वारी, बाजरीच्या दरामध्ये वाढ झाली असून डाळी आणि कडधन्यांचे दरही कडाडल्यामुळे आता खायचे काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राज्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळालेली नाही.  मात्र, शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. गहू, ज्वारी, मका, केळी, द्राक्ष, संत्री यांचे नुकसान अवकाळी पाऊस आणि गारपीठीने झाले आहे.


काय काय महागले?


- गहू 36 ते 46
- ज्वारी 52 ते 60
- बाजरी 40 ते 44
- तूरडाळ 130 ते 150
- मूगडाळ 120 ते 130
- उडीदडाळ 120 ते 140
- मूग   110 ते 130
- मटकी  120 ते 160
- शेंगदाणे 140 ते 170


 मुंबईत आता मिळणार 24 तास फूड  


दरम्यान, मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आता 24 तास फूड ट्रक्स उपलब्ध असतील.. मुंबई महापालिकेनं फूड ट्रक्सबाबत धोरण निश्चित केलंय. यानुसार मुंबईत 50 ठिकाणी 24 तास फूड ट्रक सुरु करता येतील. त्यासाठी मुंबई महापालिका लवकरच निविदा काढणार आहे.. या फूड ट्रक्ससाठी फायर ब्रिगेड, आरोग्य विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र मात्र लागणार आहे.. या फूड ट्रकच्या जागा 36 महिन्यांसाठी करारावर दिल्या जातील. मुंबईतली गार्डन्स, पर्यटन स्थळं, शाळा, कॉलेजजवळ या जागा असतील.. मात्र रेस्टॉरंटपासून किमान 200 फूट अंतर राखणं आवश्यक असेल तसंच दोन ट्रकमध्ये किमान 15 फूट अंतर ठेवावं लागणार आहे.