आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांची वारसा नोंद होणार रद्द, `या` ग्रामपंचायतीने घेतला निर्णय
Yarol GramPanchayat Decesion: आई वडिलांनाचा सांभाळ जर कोणी करत नसेल आणि अशी तक्रार आल्यास थेट त्याचा वारसा नोंद रद्द करण्यात येईल असा ऐतिहासीक निर्णय लातूर जिल्ह्यातील येरोळ ग्रामपंचायतीने घेतला आहे.
वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर: विविध जिल्ह्यांतील ग्राम पंचायती आता गावकऱ्यांच्या प्रश्नावर जागृक झालेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामसभेमध्ये किरकोळ कारणावरुन वाद घालण्यापेक्षा गावकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना हात घातला जात आहे. असाच एक निर्णय लातूरच्या यरोळ ग्रामपंचायतीने घेतला होता.
आई-वडिलांचा काळजी न घेणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या मुलांना यामुळे मोठी चपराक बसली आहे. अशा मुलांविरुद्ध कारवाईचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याआआधी कोल्हापूरच्या माणगाव ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला होता. आता यरोळ ग्रामपंचायतीने हा स्तुत्य असा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय? यावर गावकऱ्यांना काय वाटते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अलिकडच्या काळात आई-वडिलांचा सांभाळ करण्यास टाळाटाळ करणारे मुलं-मुली अनेकदा तुम्ही पाहीली असतील. अशा मुला-मुलीला चाप बसवणारा आदेश लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनं काढला आहे. आई वडिलांनाचा सांभाळ जर कोणी करत नसेल आणि अशी तक्रार आल्यास थेट त्याचा वारसा नोंद रद्द करण्यात येईल असा ऐतिहासीक निर्णय लातूर जिल्ह्यातील येरोळ ग्रामपंचायतीने घेतला आहे.
तुमच्या नावाने बँकेत बेवारस रक्कम अन् तुम्हाला माहितीच नाही? RBI नं आणलं वेब पोर्टल; जाणून घ्या सर्व
हा निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीने सर्व गावकऱ्यांसमोर हा निर्णय जाहीर केला. आता या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनीही स्वागत केला आहे. असा निर्णय घेणारी लातूर जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे. याआधी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला होता.
काही मुले आपल्या आईवडिलांचा संभाळ करत नव्हते. अशा अनेक तक्रारी ग्रामसभेकडे आल्या. त्यामुळे अशा मुलांना वारसा हक्क द्यायचा नाही असे एकमताने ग्रामसभेत ठरल्याचे येरोळचे उपसरपंच सतीश शिंदाळकर यांनी सांगितले.
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय
अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुले त्रास देत होती. प्रॉपर्टीसाठी आई वडिलांशी भांडत होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय खूप महत्वाचा असल्याची प्रतिक्रिया नामदेव शिंदाळकर या नागरिकांनी दिली.
आई वडिलांचा संभाळ न करणाऱ्यांना वारसा हक्क मिळणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला आहे. यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया राम पिचारे या नागरिकांनी दिली.
कोल्हापुरच्या माणगाव ग्रामपंचायतीचे निर्णय
नवीन वारसा नोंद करतानाही आई-वडिलांची काळजी घेण्याचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाणार आहे. आई-वडिलांची काळजी घेतली नाही तर वारसा नोंद रद्द करण्यात येईल. वारसा नोंद रद्द झाल्यावर पालकांच्या संपत्तीतही कोणता अधिकार राहणार नाही. 14 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. माणगाव ग्रामस्थांच्या निर्णयामुळे आई-वडिलांना न सांभाळणा-या मुलांना चाप बसेल अशी आशा आहे. सरकारच्या महसूल विभागाने याबाबत परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी सरकारकडे केली आहे. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी करणं क्लिष्ट ठरू शकतं याची जाणीवही ग्रामस्थांना आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या पुढाकाराने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत माणगाव इथं परिषद झाली होती. त्यामुळे माणगांव गावाला सामाजिक सुधारणेची परंपरा आहे. या गावात विधवांना सन्मान उचलण्यात आले. सायंकाळी दोन तास टीव्ही व मोबाइल बंद ठेवण्याबरोबरच अनेक निर्णय घेण्यात आले. याच ग्रामपंचायतिने 14 ऑगस्टच्या ग्रामसभेत आणखी एक ऐतिहासिक ठराव करण्यात आला. ज्यामध्ये आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलाची महसूल विभागाची परवानगी घेऊन ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद असणारी वारसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.