तुमच्या नावाने बँकेत बेवारस रक्कम अन् तुम्हाला माहितीच नाही? RBI नं आणलं वेब पोर्टल; जाणून घ्या सर्व

RBI UDGAM Portal: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज केंद्रीकृत वेब पोर्टल UDGAM (अनक्लेम डिपॉझिट्स – गेटवे टू ऍक्सेस माहिती) लाँच केले. यामुळे ग्राहकांना अनेक बँकांमध्ये जमा केलेली दावा न केलेली रक्कम एकाच ठिकाणी शोधणे सोपे होणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 18, 2023, 01:12 PM IST
तुमच्या नावाने बँकेत बेवारस रक्कम अन् तुम्हाला माहितीच नाही? RBI नं आणलं वेब पोर्टल; जाणून घ्या सर्व title=

RBI UDGAM Portal: अनेकदा आपण काहीतरी कारणाने बॅंक अकाऊंड उघडतो पण थोडेफार व्यवहार झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी त्या बॅंक अकाऊंटमध्ये आपली मोठी रक्कम पडून राहते, याचा आपल्याला विसर पडतो. काही वर्षांनी जेव्हा आपल्याला ते आठवते तेव्हा फार उशीर झालेला असतो. किती रक्कम जमा आहे? कोणत्या बॅंकेत खाते आहे? अकाऊंट नंबर काय आहे? याबद्दलची काही काहीच माहिती आपल्याला आठवत नसते. अशावेळी आपण फारच गोंधळून जातो. पण आरबीआयने अशा ग्राहकांना दिलासा दिला आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज केंद्रीकृत वेब पोर्टल UDGAM (अनक्लेम डिपॉझिट्स – गेटवे टू ऍक्सेस माहिती) लाँच केले. यामुळे ग्राहकांना अनेक बँकांमध्ये जमा केलेली दावा न केलेली रक्कम एकाच ठिकाणी शोधणे सोपे होणार आहे.

6 एप्रिल 2023 रोजी,रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने विकास आणि नियामक धोरणावर भाष्य केले होते. यावेळी बॅंकेत बेवारस जमा केलेली ठेव शोधण्यासाठी केंद्रीकृत वेब पोर्टल तयार करण्याची घोषणा करण्यात आली होती.

अनेक ग्राहकांचे मोठी रक्कम बँकांमध्ये पडून असते. कित्येक वर्षे त्यावर कोणीच दावा करत नाही. कालांतराने अशा ठेवींच्या प्रमाणात वाढ जाते. यामुळे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता आणणे गरजेचे असते. यासाठी आरबीआय वेळोवेळी अनेक मोहिमा राबवत असते. 

आता रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने अनक्लेम डिपॉझिट्स – गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन  (Unclaimed Deposits - Gateway to Access information) वेबपोर्टल सुरु केले आहे.  या वेब पोर्टलवर ग्राहकांना त्यांच्या विविध बॅंक खाती आणि त्यातील रक्कमेची माहिती मिळणार आहे. RBI लोकांना त्यांच्या संबंधित बँकांकडे दावा न केलेल्या ठेवींवर दावा करण्यासाठी, खाती ओळखण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

सर्वसामान्यांना पोर्टल किती उपयुक्त?

यूडीजीएएम वेब पोर्टल लाँच केल्याने ग्राहकांना त्यांच्या दावा न केलेल्या ठेवी/खाती ओळखण्यात मदत होणार आहे. त्यानंतर ते एकतर ठेव रकमेवर दावा करू शकतील किंवा त्यांच्या संबंधित बँकांमध्ये त्यांची ठेव खाती सक्रिय करू शकतील, असे आरबीआयने सांगितले. 

रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (ReBIT), इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाईड सर्व्हिसेस (IFTAS) आणि सहभागी बँकांच्या सहकार्याने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

RBI च्या यूडीजीएएम वेब पोर्टलवर खातेधारक सध्या सात बँकांच्या संदर्भात त्यांच्या हक्क नसलेल्या ठेवींचा तपशील मिळवू शकतील. इतर बँकांची शोध सुविधा देखील टप्प्याटप्प्याने 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्ष्मी बँक लिमिटेड, साउथ इंडियन बँक लिमिटेड, डीबीएस बँक इंडिया लिमिटेड आणि सिटी बँकेतील ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.