चेतन कोळस, झी मीडिया, येवला : हल्ली तापमान बदलामुळे पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. सध्या वातावरणात (Climate Change) एक वेगळाच बदल पाहायला मिळतो आहे. कधी ऊन तर कधी पाऊस यांमुळे वातावरणाची स्थिती बिघडल्याची पाहायला मिळते आहे. सततच्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचेही (Farmers in Maharashtra) मोठं नुकसान होते आहे. अवकाळी पावसानं शेतीची परिस्थिती बिघडली आहे. त्याचबरोबर याचा परिणाम अन्नधान्यांवरही होतो आहे. सध्या याचा परिणाम मोठ्या शेतीजन्य परिसरात पाहायला मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहकही चितेंत झाले आहेत कारण आता उत्पादन (Production) कमी झाल्यामुळे सध्या अन्नधान्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे. (Jaggery price hiked by Rs 5 to 10 maharashtra news marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पर्जन्यजन्य वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अवकाळी पाऊस (Rains) आणि त्यातून पिकांचे नुकसानही झाले आहे. अनेकदा मोठ्या प्रमाणातही शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. नुकतीच अशीच एक परिस्थिती नाशिक भागातही पाहायला मिळते आहे. 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


पावसामुळे मोठ्या प्रमाणात ऊस खराब झाला असल्याने त्याचा फटका गुळ (jaggery) उत्पादकांना बसला असून  पाच ते दहा रुपयांनी गुळाच्या भावात वाढ झाली आले.गुळ पावडर देखील 70 ते 80 रुपये किलो झाली असून गुळाची भेली देखील 40 ते 45 रुपये किलोने विकली जात आहे. यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने याचा फटका गूळ उत्पादनावर झाला असून अनेक ठिकाणी ऊस हा सततच्या पावसामुळे खराब झाला असल्याने उसाची (Sugarcane) कमतरतेमुळे गुळाच्या किमतीत देखील पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली असल्याने याचा फटका निफाड तालुक्यातील गुळ उत्पादकांना बसत आहे.


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


पहिले दोन हजार रुपयाला ऊस मिळत होता तोच उस आता 2500 ते 2800 रुपयांनी ऊस खरेदी करावा लागत असल्याने व पावसामुळे देखील ऊस खराब झाल्याने यावेळी गुळाच्या किमतीत देखील भाव वाढ झाली आहे.  गुळ पावडर (Jaggery powder) मध्ये देखील 70 ते 80 रुपये किलोने विकली जात असून गुळाची भेली ही सध्या 40 ते 45 रुपये किलो भाव झाले असल्याने या पावसाचा फटका देखील या गुळ उत्पादकांना बसताना दिसत आहे.