जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या भागातील वादळी वाऱ्यामुले शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केळी पिकाचे नुकसान होत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सुचना दिल्या जातात, मात्र प्रशासनाकडून पाहिजे ती मदत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून महावितरणने या भागात कुठलीही दखल घेतलेली नाही. विद्युत खांब वाकून खाली पडले असून कुठलाही महावितरण कर्मचारी या ठिकाणी आलेला नाही.शेतकऱ्यांचं वीजबिल थकलेलं असताना महावितणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे तगादा लावलेला. मात्र आता वीजबिले महावितरणचा कुणीही अधिकारी  याठिकाणी आले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

कुठे किती हानी?


  • चोपडा तालुक्यातील ७ गावांमधील ७५ शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली आहे.

  • रावेर तालुक्याला शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून या  तालुक्यातील १५ गावांमधील ५७६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

  • गेल्या सहा वर्षापासून अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसतोय

  • मात्र विमा कंपनी आणि सरकार पाहिजे ती मदत देत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप


नुकसान झालेली केळी फेकायला एका शेताला कमीत कमी दीड लाख रुपये खर्च करावा लागणार आहे. यात आता पेरणीचे दिवस आले असून केव्हा खोड बाहेर फेकणार आणि केव्हा पेरणी करणार? असा प्रश्न शेतकराऱ्यांसमोर उपस्थित झालाय. त्यांनी केला जात आहे. याठिकाणी प्रशासनाच्या वतीने मंत्री आले पाहून गेले; मात्र अद्याप कुठलाही पंचनामा केलेला नाही व मदत मिळाली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.


jalgaon banana farmer in trouble after heavy pre monsoon rainfall