COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव : जळगाव जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झालाय. डंपरची क्रुझर गाडीला समोरासमोर धडक होऊन वऱ्हाडातील दहा जण जागीच ठार झाले तर सात जण जखमी झालेत. चोपडा-यावल रस्त्यावरील हिंगोणे गावाजवळ हा भीषण अपघात झालाय. 


दुर्घटनेतील मृत आणि जखमी हे निबोल, चांगदेव तसंच चिंदोली गावचे रहिवासी आहेत. या अपघातात एका कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. लग्नाचं रिसेप्श आटोपून परतीच्या मार्गावर असताना ही दुर्घटना घडली. 


ही दुर्घटना इतकी भीषण होती की क्रूझर गाडीचा पार चुराडा झाला. दुर्घटनेनंतर डंपरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.