फोन टॅपिंगचा संशय; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटनं खळबळ
ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एका ट्वीटनं मोठी खळबळ उडाली आहे
मुंबई: ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एका ट्वीटनं मोठी खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील गृहमनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप गेला जात असल्याचा दावा केला आहे.
यापूर्वीही काही नेत्यांनी फोन टॅप होत असल्याचा दावा केला होता. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत आपला फोन टॅप होतोय असं वाटतं असल्याचं म्हटलं आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत आपला फोन टॅप होत असल्याचा दावा केला. आव्हाड यांनी रात्री दीडच्या सुमारास एक ट्वीट करत हा दावा केला. "माझा फोन टॅप होत असल्याचा मला संशय येत आहे. विशेषत: माझ्या व्हॉट्सअॅप कोणत्यातरी संस्थेकडून निगराणी ठेवली जात आहे," अशा आशयाचं ट्वीट आव्हाड यांनी केलं.