Mhada Lottery 2023 : म्हाडाने एका दिवसात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. नव्या वर्षात म्हाडा तुम्हाला हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सज्ज झालं आहे.  म्हाडाच्या घरांसाठीची नोंदणी सेवा गुरुवारपासून सुरु होणार आहे. म्हाडाची संगणकीय सोडत आता 100 टक्के ऑनलाईन होणार असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर पुण्यात(Pune) 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी निघणार असल्याची घोषणा म्हाडाने केली आहे(Mhada Lottery 2023). 


पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील घरांसाठीही देखील लॉटरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे म्हाडाच्या 5 हजार 966 घरांची जम्बो लॉटरी निघणार आहे. या घरांसाठी पाच जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. तर 17 फेब्रुवारीला या घरांची सोडत काढण्यात येणार आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील घरांसाठीही अर्ज करता येणार आहे. यामुळे पुणेकरांचे देखील हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 
सोडतीआधीच कागदपत्रांची छाननी होणार


गुरुवारपासून म्हाडाच्या घरांसाठी नोंदणीला सुरुवात होते. या एका नोंदणीतून तुम्ही सर्वच मंडळांसाठी अर्ज करू शकता. सोडतीआधीच तुमच्या सर्व कागदपत्रांची छाननी होणार आहे. त्यामुळे  सोडत जिंकणाऱ्यांना घराचा ताबाही लवकर मिळणार आहे. पूर्वीसारख्या वेळखाऊ प्रक्रियेतून अर्जादारांची सुटका होणार आहे.  सोडतीआधी आधार, पॅन, उत्पन्नाचा आणि निवासाचा दाखलाही सादर करावा लागणार आहे. 


म्हाडाची संगणकीय सोडत 100 टक्के ऑनलाईन


म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता IHLMS 2.0 (Integrated Housing ottery Management System) ही नवीन संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे. नागरिकांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता नोंदणी प्रक्रिया अमर्याद खुली राहणार आहे.  नोंदणी प्रक्रियेदरम्यान अर्जदारास एक युनिक क्रमांक प्राप्त होणार आहे व याआधारे अर्जदाराचे स्वतंत्र कायमस्वरूपी प्रोफाइल नूतन संगणकीय सोडत प्रणालीमध्ये तयार होणार आहे. अर्जदारांच्या अर्जाची अचूक पडताळणी या प्रणालीद्वारे त्वरित होणार आहे.


असा करा अर्ज? (How to apply for Mhada Lottery )


इच्छित ठिकाणी घर घेण्यासाठीची सोडत जाहीर झाल्यानंतर अर्जदारांनी अर्ज करत पुढील प्रक्रीया पूर्ण करावी. नव्या नियमांनुसार नोंदणी करतानाच अर्जदारा (इच्छुक) पॅनकार्ड (Pancard), आधारकार्डसह (adhar card) उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला सादर करावा लागणार आहे. तर, सामाजिक आणि इतर आरक्षित वर्गातील अर्जदारांनी सदरील प्रमाणपत्र, जातीचा दाखला सादर करावा लागणार आहे. 


एका दिवसात मिळणार म्हाडाच्या घराचा ताबा 


घर मिळताच विजेत्यांना देकार पत्र मिळाल्यानंतर त्यांनी घराची संपूर्ण रक्कम भरल्यास अशा विजेत्यांना एका दिवसात घराचा ताबा मिळणार आहे. दरम्यान सोडतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असून, फक्त घराची चावी आणि कराराच्या कारणानंच इच्छुकांना म्हाडाच्या कार्यालयात जावं लागणार आहे.