कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय. कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय. त्यामुळे राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद शाबूत राहणार आहे. 


नगरसेवकपद रद्द कऱण्याचा निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवळेकर यांचं नगरसेवकपद रद्द कऱण्याचा निर्णय कल्याण सत्र न्यायालयाने दिला होता. वैश्य वाणी समाजाला ओबीसी मधून वगळण्यात आल्यानं आपोआपच त्यावेळी त्यांचं नगरसेवक पद सुद्धा रद्द झालं होतं.मात्र पुन्हा 2015 साली झालेल्या निवडणुकीत देवळेकर निवडणूक लढले आणि जिंकून आले. 


मात्र देवळेकर यांना दिलासा


याला त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप चे अर्जुन म्हात्रे यांनी न्यायाल्यात आव्हान दिलं होतं. मात्र उच्च न्यायालयाने आता देवळेकर यांना दिलासा दिलाय.