कणकवली : कणकवलीतल्या राड्याचा दुसरा व्हिडिओ पुढे आला आहे. कणकवलीचा राडा नेमका याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सुरू झाला. कणकवलीचे नगराध्यक्ष सुमीर नलावडे यांच्या समर्थकाला भाजपचे नेते संदेश पारकर यांच्या गटाने जोरदार मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे. यात महाविद्यालयीन तरूणाला मारहाण झाल्याचे वृत्त कणकवली परिसरात पसरताच कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह सुमारे दहा ते 15 जणांचा गट संदेश पारकर यांच्या घरावर चाल करून गेला होता. आणि त्यानंतर कणकवलीतील राडा पेटला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कणकवली राडा प्रकरणातील संशयित आरोपी आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासहित २० जणांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कणकवली शहरात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि भाजप यांच्यात झालेल्या राडा प्रकरणातील क्लिप फक्त झी २४ तासाच्या हाती लागली आहेत. कणकवलीचे नगराध्यक्ष आणि राणे समर्थक समीर नलावडे स्वतः तोडफोडीत सामील झाल्याचं स्पष्ट दिसतंय.  यावेळी नलावडेंनी अर्वाच शिवीगाळ केल्याचंही स्पष्ट आहे.


स्वतः गाड्यांची तोडफोड केलीच. इतरांनाही गाड्य़ा फोडण्यास प्रवृत्त केलंय. दरम्यान या प्रकरणी १३ संशयितांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले असून या सर्वांना कोर्टात हजर करण्यात आलंय. त्यात समीर नलावडेंचाही समावेश आहे. दरम्यान भाजपचे संदेश पारकर यांच्या घरी पोलिसांचा काडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कायदा व  सुरक्षा राखण्यासाठी शहरात पोलिसांची अधिक कुमक वाढविली आहे.