मुंबई : कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivli corona patients) मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आज कल्याण-डोंबिवलीमध्ये ८२५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केडीएमसीत नवे नियम काय?


1. महापालिका क्षेत्रात शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद


२. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार


३. फेरीवाल्यांवरील बंदी कायम


४. शनिवार-रविवार हॉटेल्स, रेस्टॉरंट-बारमध्ये फक्त पार्सल सुविधा


गेल्या आठवड्याभरापासून कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 


एकट्या मार्च महिन्यात ७ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत बेडचा तुटवडा भासतो का, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच्या या शंकेवर महापालिका आयुक्तांनीच उत्तर दिले आहे. 


काय म्हणाले केडीएमसीचे आयुक्त?


कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र नागरिकांना चिंता करू नये. केडीएमसीकडे मुबलक प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. 


ताप्तुरत्या स्वरूपात बंद केलेले कोविड सेंटरही पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर टिटवाळ्यात बंद केलेले जम्बो कोविड सेंटरही येत्या काही दिवसांत ऑडीट करून सुरू केले जाईल, असं आश्वासन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे. 


कल्याण-डोंबिवलीत सध्या काय आहे परिस्थिती? 


उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७ हजार १०१
एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या  ६६ हजार ३२३

बेडची उपलब्धता कशी?


विलगीकरण कक्ष


एकूण बेड रिक्त बेड
२ हजार ४३८  ७२६

कोविड सेंटर


एकूण बेड रिक्त बेड
१ हजार २४३ ३४५