श्रीमंत बापाच्या पोराचं अपहरण, पोलिसांनी रचला सापळा अन् कामगिरी फत्ते
रुद्रा झा या 12 वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी कुख्यात गुंड फरदशहा रफाई आणि प्रिसकुमार सिंग यांनी मिलापनगर परिसरातून अपहरण केलं होतं.
अतीश भोईर, झी मीडिया, डोंबिवली: डोंबिवली मधील अपहरण (Kidnapping) झालेल्या एका बारा वर्षाच्या मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले. यासाठी डोंबिवली कल्याण उल्हासनगर अशा तब्बल 200 पोलिसांचा फौजफाटा 75 तासापासून अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेत होते. अखेर या पथकाने गुजरातच्या सुरत मधून कुख्यात गुंडांच्या तावडीतून या मुलाची सुखरूप सुटका केली. अतिशय संवेदनशील असलेल्या प्रकरणात चिमूरडयाला (Child) कोणतीही इजा हाऊ न देता त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन करणाऱ्या पोलिसांचं कौतुक होतं आहे. (Kidnapped 12-year-old boy releases from notorious gangsters after 75 hours)
रुद्रा झा या 12 वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी कुख्यात गुंड फरदशहा रफाई आणि प्रिसकुमार सिंग यांनी मिलापनगर परिसरातून अपहरण केलं होतं. रुद्रा हा 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता ट्युशनला जात असताना या दोघांनी कार मधून अपहरण केलं. दरम्यान ट्युशनला (Tuition Classes) गेलेला आपला मुलगा परत न आल्याने रुद्रच्या वडिलांनी मानपाडा पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली. याच दरम्यान अपहरणकर्त्यांनी चोरीच्या मोबाईल (Moblie) वरून रुद्राच्या वडिलांना फोन करून रुद्रा सहीसलामत हवा असेल तर 1 कोटींची खंडणी मागितली. रुद्राचे वडील रणजित झा हे मोठे व्यापारी आहेत. याची अपहरणकर्त्याना माहिती असावी.
कसं केलं अपहरण?
हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल
दरम्यान रुद्राच्या अपहरणाचा गुन्हे दाखल होताच मानपाडा (Manpada) पोलिसांनी ही बाब अतिशय गंभीरपणे घेत पोलिसांची तब्बल 20 पथकं या अपहरणकर्त्यांच्या मागावर लावली. मात्र अपहरणकर्ते सातत्याने आपला मार्ग बदलत होते. विशेष म्हणजे या अपहरणकर्त्यांनी डोंबिवली, पालघर आणि गुजरात परिसरात भाड्याने घर घेऊन ठेवली होती. पोलिसांना चकवा देण्यासाठी ते नाशिकला (Nashik) देखील गेले होते. सुरुवातीला ते रुद्रला पालघर येथे घेऊन गेले. याच दरम्यान पोलिसांना ही गाडी दिसतात पोलिसांनी ही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या अपहरणकर्त्यांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मागेपुढे न पाहता या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली.
कसा लागला तपास?
मात्र अपहरकर्त्यांनी गाडी मध्ये च सोडून ते पालघरच्या जंगल भागात रुद्रा ला घेऊन गेले. यावेळी अपहरण कर्त्यांच्या गाडी पोलिसांच्या हाती लागताच गाडीची झडती घेतली असता त्यात तीक्ष्ण हत्यारे असल्याचे पोलिसांना दिसले.यावरून रुद्रा च्या जीवाला धोका असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी या तपासात आणखी काळजी घेतली. दरम्यान पालघर (Palghar) जंगल मार्गे पोलिसांना चकवा देत अपहरणकर्ते सुरतला गेले. याच दरम्यान पालघरच्या जंगलामध्ये तब्बल 200 पोलीस आणि 300 स्थानिक अनेक तास या अपहरणकर्त्याचा शोध घेत होते. शिवाय अपहरणकर्त्याना पकडण्यासाठी पोलिसांनी 50 हजारांचे बक्षीस देखील स्थानिकांना जाहीर केलं होतं.
हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा
काय होतं नेमकं प्रकरण?
अखेर मोठ्या शिताफीने तांत्रिक विश्लेषणाच्या (anaysis) आधारे पोलीस अपहरणकर्ते भाड्याने राहत असलेल्या गुजरातच्या सुरत परिसरात पोहचले. त्या ठिकाणी रुद्र हा सुरक्षित असल्याचं पोलिसांना कळताच त्या घरावर छापा टाकला. आणि या दोन मुख्य अपहरणकर्त्यांसह तीन महिलांना पोलिसांनी अटक केली. या सगळ्या संवेदनशील तपासात पोलिसांनी मोठ्या धैर्याने आणि मोठ्या चालाखीने या तपास करत रुद्रला सही सलामत त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलंय. पोलिसांच्या या कामगिरीचं रुद्राच्या कुटुंबीयांबरोबरच सगळ्यांकडून कौतुकांचा वर्षाव होतोय. धक्कादायक म्हणजे यातील मुख्य आरोपी फरदशहा रफाईवर डबल मर्डर आणि दारू तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.