प्रताप सरनाईक, झी मीडिया, कोल्हापूर : बैलगाडी किंवा घोडागाडी शर्यत म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे थरार. तुफान वेगाने धावणारे शर्यतीतील घोड्यांना पाहण्यासाठी असलेली बघ्यांची एकच गर्दी असते. या अशा शर्यतींमध्ये अनेक थरारक घटना पाहायला मिळतात. कोल्हापुरात असाच एक थरार पाहायला मिळाला. या सर्व घटनेचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (kolhapur driver of the horse drawn carriage fell video viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोल्हापुरात घोडागाडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ठरल्याप्रमाणे शर्यतीला सुरुवात झाली. प्रत्येक गाडीवान प्रथम येण्याससाठी आपल्या जोडीला वेगाने पळवत होता. या दरम्यान घात झाला.  एक गाडीवान घोडागाडीपुढे पळत आहे. गाडीवानचा पळता पळता तोल सुटल्याने तो थेट घोड्यांच्या टापाखाली आला.


गाडीवान टापाखाली आला इथवरच सर्व काही आवरलं नाही. या गाडीवानाच्या अंगावर पाठीमागून येणाऱ्या अनेक गाड्या सुसाट वेगाने धावत गेल्या. या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे त्या बघ्यांनाही त्या गाडीवानाची मदत करता आली नाही.