कोरेगाव भिमा दंगलीत भिडे, एकबोटेंचा हात - सत्यशोधन समिती
कोरेगाव भिमा दंगल हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा सत्यशोधन समितीने केला आहे.
पुणे : कोरेगाव भिमा दंगल हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा सत्यशोधन समितीने केला आहे. यात संभाजी भिडे तसेच मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचंही सत्यशोधन समितीने म्हटलं आहे. कोरगाव भिमामध्ये स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या दलितांवर आधी हल्ला करण्यात आला, यानंतर दंगल उसळल्याचं सत्यशोधन समितीच्या अहवालात म्हटलं आहे.
सत्यशोधन समितीची अहवाल
१ जानेवारी २०१८ रोजी जेव्हा कोरगाव भिमात दंगल उसळी, तेव्हा कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, यांनी दंगलीच्या चौकशीसाठी १० दलितांची सत्यशोधन समिती नेमली होती, त्या समितीने हा अहवाल दिला आहे.
सुनियोजित कट असल्याचाही दावा
हा सुनियोजित कट असल्याचं सांगत, ३० डिसेंबर २०१७ रोजी परिसरातील सोनई हॉटेलमध्ये मिलिंद एकबोटे यांनी बैठक घेतल्याचं समितीत म्हटलं आहे. तसेच संभाजी भिडे यांचं त्या ठिकाणी येणं जाणं होतं, तसेच आपण हे सारे पुरावे सादर करू असं सत्यशोधन समितीने म्हटलं आहे.
काय आहे भीमा कोरेगाव दंगल प्रकरण
१ जानेवारी १८१८ रोजी भिमा कोरेगावच्या लढाईत ८०० दलितांनी इंग्रजांकडून लढत, बाजीराव पेशव्यांच्या २७ हजार सैनिकांना हरवलं होतं, या घटनेला २०० वर्ष पूर्ण झाले, यासाठी कोरेगाव भिमाजवळ उभारलेल्या स्तंभाला तसेच सैनिकांना अभिवादन करण्यासाठी, १ जानेवारी २०१८ रोजी दलित बांधव जमले होते, त्यांच्यावर सुरूवातीला हल्ला करण्यात आला, यानंतर दंगल उसळी असं अहवालात म्हटलं आहे.
यानंतर राज्यभरात दुसऱ्या दिवशी दलित संघटनांनी कडकडीत बंद पाळला, तसेच अनेक ठिकाणी निषेध व्यक्त केला.