अलिबाग : Hirkani Wadi, Raigad landslide : पावसाने धुमाकूळ घातला आहे. (Rain in Raigad) या पावसाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. संकटावर संकट कोसळत आहे. रायगड जिल्ह्यातील महाड जवळ किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे आज सकाळी मोठी दरड कोसळली (landslide) असून संपूर्ण वाडीला धोका निर्माण झाला आहे. तिथे कुणाचाही संपर्क होत नसल्याचे चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, या गावातील कुटुंबे जवळच्या दुसऱ्या वाडीत सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाली असून किल्ले रायगडावरून येणारे मोठे मोठे दगड गावावर येत आहेत. अनेक घरांना तडे गेले असून ग्रामस्थ प्रचंड भीतीच्या छायेत वावरत आहेत.  (landslide in Hirkani Wadi, Raigad )


खडीकोळवण येथे दरड कोसळली, ग्रामस्थांत भीती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामस्थ मदतीसाठी याचना करीत आहेत, परंतु प्रशासनाशी संपर्कच होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील घरांना लागूनच दरडीचा मोठा भाग प्रचंड वेगाने खाली आला आहे. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे. दरम्यान, आधीच्या दुर्घटनेतील तळीये गावात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बाळाचा मृतदेह बाहेर काढला आहे. मदत आणि बचावकार्य सुरुच आहे. रायगडच्या महाडमधील तळीये गावात दरड कोसळल्याने तब्बल 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे.


तळीये दुर्घटना : आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढले


मागील दोन दिवस कोकणात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत आहे. (Maharashtra Rain) पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. पाणी ओसरले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात आणखी एका ठिकाणी दरड कोसळली आहे. हिरकणी वाडी येथे ही दरड कोसळली आहे. याआधी महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दरडीखालून आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. महाड तालुक्यात तळीये 38, पोलादपूर तालुक्यात साखर सुतारवाडी इथे 5  तर पोलादपूर तालुक्यातच केवनाळे इथे 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. (Mahad, Raigad landslide update : A total of 49 bodies retrieved from the debris )


दरम्यान, महापुरामुळे महाड शहरातील अनेक घरांमध्‍ये दुसऱ्या मजल्‍यापर्यंत पुराचे पाणी शिरले होते. काही बैठी छोटी घरे पूर्णपणे पाण्‍यात बुडाली होती. या पुरामुळे महाडकरांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्‍याचे भीषण वास्‍तव पूर ओसरल्‍यानंतर समोर आले आहे. कारण शहरात काही ठिकाणी 10 ते 12 फुटांपेक्षा अधिक पाणी होते. 


व्‍यापाऱ्यांच्‍या दुकानातील साहित्‍याचे नुकसान झाले आहे. तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाल्‍याचे पहायला मिळाले. अनेकांच्‍या घरातील टीव्‍ही, फ्रीज व इतर किंमती वस्‍तू पुराच्‍या पाण्‍यात भिजून खराब झाल्‍या . शहरातील बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्‍य होते. तर घरातील वस्‍तुंवर चिखलाचा थर साचला होता. महाडकर नागरिक आणि व्‍यापारयांनी साफसफाईचे काम सुरू केले आहे.