Vidhasabha Decesion: राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहे. राज्यातील शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी हिवाळी अधिवेशनातून समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ फडणवीस सरकारनी मोठी घोषणा केलीये. शिवनेरी किल्यावर सर्वात मोठा स्वराज्यध्वज लावला जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता शिक्षेची तरतूद करण्यात आली असून एक लाख आणि तुरुंगवासाची शिक्षा असणार असल्याचं विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.


गडकिल्ल्यावर जाऊन मद्यमान करण्याचे प्रकार वारंवार समोर येतात. इतिहासाची विटंबना करणाऱ्या अशा महाभागांना शिवप्रेमींकडून समज दिली जाते. पण यांच्यावर कठोर कारवाईची तरतूद कायद्यात असावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून वारंवार केली जात होती. यासंदर्भात अधिवेशनात निर्णय घेण्यात आलाय.  


परभणी घटनेवरून विरोधक आक्रमक


परभणी घटनेवरून विरोधक आक्रमक झालेत. आरोपींवर कारवाई करण्यासाठी  विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यावर आंदोलन केलं. त्यानंतर विधानसभेतही गोंधळ झाला. विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बीड, परभणी घटनेवरून सरकार गंभीर नाही, असा आरोप करत विरोधकांचा सभात्याग केलाय.


विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआकडून हालचाली 


विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून नागपूरमध्ये अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटायला उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली. तिथून उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या दालनात दाखल झाले. तिथे उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांशी चर्चा केली. विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याच्या मार्गावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यालय आहे. उद्धव ठाकरेंनी या कार्यालयावरून जाताना, त्या दिशेला तोंड करूनही पाहिलं नाही. दरम्यान उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात असतानाच, तिथे नेमके शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई आणि आशिष जयस्वालही दाखल झाले. मात्र ते लगेचच अध्यक्षांच्या दालनातून बाहेर पडले.