सेव्हन इलेव्हन क्लब बॉम्बने उडवू, लष्कर ए तोयबाची धमकी
सेव्हन इलेव्हन क्लब बॉम्बने उडवून देण्याची धमकी
मीरा भाईंदर : मीरा भाईंदरचा वादग्रस्त सेव्हन इलेव्हन क्लब बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. बुधवारी मेल पाठवून ही धमकी देण्यात आली. माजी आमदार नरेंद्र मेहता यांचं हे पंचतारांकीत हॉटेल आहे.
धमकीच्या मेलमध्ये १०० बीटकॉईन म्हणजे ७ कोटींची मागणी करण्यात आलीय. २४ तासांत ७ कोटी मिळाले नाहीत तर बॉम्बस्फोट घडवू असा मजकूर मेलमध्ये आहे.
मेहता यांनी पोलिसांना या मेलची माहिती दिल्यावर इथे तपास सुरू झाला. रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून हॉटेलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू होतं. आता हा मेल खरंच लष्कर ए तोयबाकडून आलाय का याचा शोध घेतला जातोय.