Gautami Patil : गौतमी पाटील आणि राडा हे जणू आता समीकरणच झालंय. कुठेही तिचा कार्यक्रम असला तरी हाऊसफुल्ल गर्दी असतेच असते. मात्र तिचा कार्यक्रम मनोरंजनापेक्षा चर्चेत राहतो तो राड्यामुळे. सांगलीच्या (Sangli) तासगावातही हेच पाहायला मिळालं. गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरूणांनी (Rowdy Public) राडा सुरू केला आणि पोलिसांनी या हुल्लडबाजांना चांगलंच बदडून काढलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढदिवसाला गौतमीचा कार्यक्रम
तासगावच्या वायफळे गावातील विठ्ठल घोडके आणि रुपाली घोडके या दाम्पत्यानं लग्नाच्या 25 व्या वाढदिवसासाठी (Wedding Anniversary) गौतमीचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमात राडा होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आणि खासगी सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होते. मात्र तरीही प्रेक्षकांचा धांगडधिंगा सुरू होता. अखेर पोलिसांचा संताप अनावर झाला आणि दात ओठ खात त्यांनी या गोंधळी प्रेक्षकांना लाठ्यांचा प्रसाद दिला. 


लहान मुलासोबत डान्स
विठ्ठल घोडके आणि रुपाली घोडके यांनी भर स्टेजवर गौतमीपाटीलसोबत केकही कापला. इतकंच काय तर गौतमी पाटीलने एका लहान मुलासोबत गाण्यावर ठेका धरला. त्या मुलाला डान्सच्या स्टेप्सही शिकवल्या. यावेळी एकच जल्लोष करण्यात आला. 


कार्यक्रमापेक्षी बंदोबस्ताचा खर्च जास्त
गौतम पाटीलच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी, वाद आणि मारहाण असे प्रकार सर्रास होताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबरोबरच पेड पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यासाठी कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांना पैसै द्यावे लागणार आहेत. म्हणजेच गौतमीच्या मानधनापेक्षा दुप्पट रक्कम पोलीस बंदोबस्तासाठी भरावी लागणार आहे. 



'गौतमी पाटील महाराष्ट्राचा बिहार करू नका'
छोटा पुढारी अर्थात घन:शाम दराडेनंही (Ghyanshyam Darade) गौतमीला खडेबोल सुनावले होते. महाराष्ट्राचा बिहार (Bihar) करू नका आणि तसं झालं तर चुकीला माफी नाही अशा शब्दात छोट्या पुढारीनं गौतमीची कानउघाडणी केलीय. याला गौतमी पाटीलनेही प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रचा बिहार केल्याचा आरोप चुकीचा असल्याचं गौतमीने म्हटलंय. तसंच आपण महाराष्ट्राची संस्कृती जपत आहोत, मी चांगल्या पद्धतीने नृत्य सादर करत आहे असं सांगत गौतमीने इतर महिला दिसत नाहीत का? असा सवलाही उपस्थित केला आहे. 


गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. ही निश्चितच महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे असच सुरू राहिलं तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला फारसा वेळ लागणार नाही.