Pune Ganpati Visarjan LIVE : 28 तासांच्या मिरवणुकीचा विक्रम मोडणार?
Ganpati Visarjan in Maharashtra Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत.
Ganpati Visarjan 2024 in Maharashtra Live Updates: लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना मोठी गर्दी असते. पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती आणि मानाच्या पाच गणपतींची आज मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुक निघणार आहे. तसंच, नागपूरसह राज्यातील इतर जिल्ह्यातही विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळणार आहे.
Latest Updates
28 तासांच्या मिरवणुकीचा विक्रम मोडणार?
मानाच्या पाच गणपतीसह अलका चौकातून 86 मंडळे विसर्जनासाठी रवाना झाली आहेत. पुण्यात 21 तासाहून अधिक वेळ मिरवणूक सुरू आहे. गेल्या वर्षी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मिरवणूक संपली होती. मागील वर्षी जवळपास 28 तास मिरवणूक चालली होती. यावर्षी मिरवणूक कधी संपते या कडे लक्ष लागलं आहे.
भाऊसाहेब रंगारी गणपती अलका चौकात
भारतामधील पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी अलका चौकात दाखल. काही वेळात भाऊ रंगारी गणपतीचे होणार विसर्जन!
पुण्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन...भाविकांकडून उत्साहात गणरायाला निरोप..पांचाळेश्वर मंदिरात विधीवत पूजा आणि आरती करून दगडूशेठ गणपतीचंही विसर्जन
पुण्याचा मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे विसर्जन
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं विसर्जन
नाशिकच्या गोदा घाट परिसरामध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात
नाशिकच्या गोदा घाट परिसरामध्ये गणरायाची विसर्जन होण्यास सुरुवात झाली.नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरात 29 ठिकाणी 56 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत आणि गोदावरी नदी पात्रात गणरायाला विसर्जित करण्यात ऐवजी येऊ द्या आणि देव पण घ्या अशा पद्धतीचा आवाहमहानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. अनेक महाविद्या तर्फे गोदा घाट परिसरामध्ये 1400 पेक्ष्या जास्त सेवम सेवक सहभागी झाले आहे.देवघे द्या आणि देव पण घ्या अशा पद्धतीचा आवाहन या विद्यार्थ्यांकडून करण्यात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
गणरायाच्या विसर्जनाला जोरदार सुरुवात
अकरा दिवसाच्या उत्सवानंतर आता गणरायाच्या विसर्जनाला जोरदार सुरू झाली आहे. नाशिकच्या जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून दादा भुसे यांच्या उपस्थितीत पहिल्या मानाच्या गणपतीचे पूजा करून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे... यात 21 चित्ररत असून ढोल ताशाच्या गजरात ही मिरवणूक निघालेली आहे.. यावर्षी मिरवणुकीमध्ये डीजेच्या दणदणात असला तरी एलईडी लाईट ला शंभर टक्के बंदी घालण्यात आली आहे.
21 चित्ररत असून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक
अकरा दिवसाच्या उत्सवानंतर आता गणरायाच्या विसर्जनाला जोरदार सुरू झाली आहे. नाशिकच्या जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून दादा भुसे यांच्या उपस्थितीत पहिल्या मानाच्या गणपतीचे पूजा करून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.यात 21 चित्ररत असून ढोल ताशाच्या गजरात ही मिरवणूक निघालेली आहे.. यावर्षी मिरवणुकीमध्ये डीजेच्या दणदणात असला तरी एलईडी लाईट ला शंभर टक्के बंदी घालण्यात आली आहे.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत महालक्ष्मी अवतरली
कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत महालक्ष्मी अवतरली आहे. दत्ताजीराव काशीद तरुण मंडळाचे कार्यकर्ते बाळा जाधव यांनी महालक्ष्मीचे रूप साकारलंय.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीसमोर तृतीयपंथीयांचे वादन
पुण्यात नामांकित ढोल ताशा पथक वादन करत असतात. परंतु आजच्या विसर्जन मिरवणुकीत तृतीय पंथीयांचे ढोल ताशा पथक लक्ष वेधत आहे. शिखंडी ढोल ताशा पथक असे तृतीयपंथीयांचे पथक आहे. मानाच्या तिसरा गणपती गुरुजी तालीम ला हे तृतीयपंथी वादन करत आहेत.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
आज लाडक्या बाप्पाचे विसर्जन होणार असून जळगाव शहरातील जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपती ची आरती करून मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला जळगाव शहरातून सुरुवात झाली आहे. जळगाव शहरात 300 पेक्षा अधिक मंडळ असून जोपर्यंत जळगाव शहर महापालिकेच्या मानाच्या गणपतीची आरती होवून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत नाही तोपर्यंत जळगाव शहरातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही
Ganapati Visarjan Celebration Live Updates: मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम बेलबाग चौकात दाखल
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम बेलबाग चौकात दाखल झाला आहे. फुलांची भव्य आकर्षित सजावट केलेल्या रथावर विराजमान होऊन भव्यविसर्जन मिरवणूक निघाली आहे
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुणे विसर्जन मिरवणुकीला परदेशी पाहुण्यांची हजेरी
गणपती विसर्जन मिरवणुकीत परदेशी पाहुण्यांनी देखील हजेरी लावली. गणपती बाप्पा मोरया म्हणत हे उत्स्फूर्तपणे मिरवणूक मध्ये सहभागी झाले. भारतीय पारंपरिक पेहराव करत हे सर्वजण सहभागी झाले.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: मानाचा पहिला विशाल गणपती मिरवणूक सुरू
अहमदनगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते महापूजा करून शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये. मानाच्या 12 गणपतीपैकी श्री विशाल गणपती हा प्रथम क्रमांकाचा गणपती आहे.शहरातील 17 मंडळे आणि इतर घरगूती गणपतींची तब्बल 14 तास विसर्जन मिरवणुक चालते. त्यानंतर विसर्जन मार्गावरून मिरवणूक ही नेप्ती नाका परिसरातील विसर्जन कुंड येथे पोहोचते.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्यात घरगुती लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी
आज अनंत चतुर्दशी असून आज १० दिवसाच्या मुक्कामा नंतर लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय,पुण्यात मानाच्या गणपती सोबत मोठ्या संख्येने घरगुती गणपती हे बसवले जातात आणि आज या लाडक्या बाप्पाला पुणे महानगर पालिकेने बनवलेल्या कृत्रीम हौदात विसर्जीत केलं जातंय
Ganapati Visarjan Celebration Live Updates: मानाचा दुसरा गणपती पालखीत विराजमान
बेलबाग चौकात मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी दाखल झाला आहे. पारंपारिक पद्धतीने गणेशाची मूर्ती पालखीत विराजमान असून भंडाऱ्याची उधळण करून बाप्पाची मिरवणूक सुरू झाली आहे.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. मंडईतील टिळक पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची आरती झाली. पालकमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रविंद्र धंगेकर, उद्योजक पुनीत बालन, गणेशभक्तांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली. पालकमंत्री अजित पवार यांनी आरतीचा मान स्थानिक आमदार रवींद्र धंगेकर यांना दिला. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, ढोल ताशा गजर अशा मंगलमय वातावरणात बाप्पा मार्गस्थ.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: अकोल्याच्या मानाचा गणपती 'बाराभाई गणेशाच्या' विसर्जनाला सुरुवात
अकोल्यात ही सार्वजनिक गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. अकोल्याच्या मानाचा गणपती " बाराभाई गणेशाच्या " पूजे नंतर गणेश सार्वजनिक विसर्जनाला सुरुवात होते. बाराभाई गणेश हे आकोल्याचा मानाचा गणेश आहे , ही मूर्ती शाडूमातीची असून 12 विविध जातींच्या लोकांनी एकत्रित येऊन या मंडळाची स्थापना केली होती.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: नागपूरचा राजा गणरायाची विसर्जन मिरवणूक
नागपूरच्या राजा गणरायाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे.तुळशीबाग येथून बाप्पाची ही दिमाखदार विसर्जन मिरवणूक निघाली असून महाल, संत्रा मार्केट यासह शहरातील विविधभागातून ही विसर्जन मिरवणूक जाईल. ढोल ताशांच्या गजरात बाप्पा आपल्या गावाला निघाले आहे.
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: श्रॉफ बिल्डींग पुष्पवृष्टीवर सर्वांच्या नजरा
चिंचपोकळी इथं असणाऱ्या श्रॉफ बिल्डींग पुष्पवृष्टी मंडळाच्या माध्यमातून आता इथून जाणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. इथं प्रथम परळच्या महाराजावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर या मार्गावरून अनेक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पुढे जातील.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: केसरी वाडा मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरवात
पुण्यातील मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरी वाडा मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली असून लाडक्या बाप्पाचा पालखी रथ रथ विठ्ठू माऊलीच्या प्रतिकृतीने सजविण्यात आला आहे.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: मानाचा पहिला कसबा गणपती मंडई चौकात दाखल
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारी प्रचंड गर्दी
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोबा गर्दी झाली असून, मंडळाचं मुख्य प्रवेशद्वार तोडून भाविकांनी गणपतीपुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. या भागामध्ये सध्या प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हेसुद्धा वाचा : Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाला 10 दिवसांत 'इतक्या' कोटींचं दान
Ganapati Visarjan Celebration Live Updates: थोड्याच वेळात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला होणार
काहीच वेळात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार मुरलीधर मोहोळ मंत्री चंद्रकांत पाटील मंडई चौकात उपस्थित. मानाचा पहिला कसबा गणपती आल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्याचा तुळगी बागेचा चौथ्या मानाच्या गणपतीची मिरवणुक भागीरथातुन निघणार
पुण्याचा तुळगी बागेचा चौथ्या मानाच्या गणपतीची मिरवणुक जग्गनाथ पुरीची प्रतिकृती असलेल्या भागीरथातुन निघाणार आहे. यासाठीची जय्यत तयारी करण्यात आलीय यावेळी रांगोळी फुलांच्या पायघड्या सोबतच भागीरथाची आकर्षक सजावट करण्यात आली असुन श्रींची मूर्ती चांदीच्या दागिन्यांनी सजविण्यात आलीय
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात
पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढत पारंपारीक वाद्याच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे,
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्याचा दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी; चांदीच्या पालखीतून मिरवणूक निघणार
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची काही वेळातच विसर्जन मिरवणुक सुरु होणारा असून लाडक्या बाप्पाची चांदीच्या पालखीतून आकर्षक सजावट करत मिरवणुक सुरु होणार आहे, पारंपारिक वाद्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्याचा तिसरा मानाचा गणपती राजा गुरुजी तालीम; सुर्यरथातुन मिरवणुकीसाठी सज्ज
पुण्याचा राजाची सुर्यरथातुन मिरवणुक निघणार असुन सुर्यरथ आकर्षक फुलमाळांनी सजविण्यात आला असुन रांगोळीच्या पायघड्या आणि गुलालाची उधळण करत गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला काहीच वेळात सुरुवात होणार असुन यामध्ये गुलालाची उधळण मुख्य आकर्षण रहाणार
पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत लोकमान्य टिळक वेधतायत लक्ष
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. सध्या पुण्याच्या रस्त्यांवर एक चिमुकला लोकमान्य टिळक बनला आहे. सर्वांचे लक्ष हा वेधून घेत आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणत हा चिमुकला रस्त्यावर फिरत आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी आलेले सर्वच जणांना या चिमुकल्या बरोबर फोटो काढण्याचा मोह आवरत नाही.
तुकाराम माळी तालीम मंडळाची मिरवणूक
विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी असणारा तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती मिरवणूक मार्गावर आला आहे.थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: बारामतीत तृतीयपंथीयांच्या हस्ते श्री गणेशाची आरती
बारामती शहरातील विजयनगर युवा प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने तृतीयपंथीयांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांनाही समाजात समानतेची वागणूक मिळावी. यासाठी मंडळाच्या वतीने तृतीय पंथीयांचा आरतीचा सन्मान देऊन त्यांचा अनोखा सन्मान करण्यात आला आहे.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी
कोल्हापुरात देखील गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मिरजकर तिकटी, महाद्वार रोड या पारंपारिक मुख्य मिरवणूक मार्गासह सार्वजनिक मंडळासाठी तीन मार्ग तयार करण्यात आले आहेत. शहरातील इराणी खाणीतच गणेश विसर्जन केले जाणार आहे, पंचगंगा नदीत सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन होऊ नये यासाठी महानगरपालिकेने नदी घाट कडे जाणारा रस्ता बॅरॅकेट्स लावून आडवीले आहेत
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त 17 रस्ते वाहतुकीस बंद
वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे तर शहरातील प्रमुख 17 मार्गावरील वाहतूक विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद असणार आहे. शहरात 48 तास अवजड वाहनांना ही बंदी असणार आहे.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी तगडा पोलिस बंदोबस्त
पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पाच मानाच्या गणपतींची मिरवणूक दहा वाजता
पुण्यातील पाच मानाचे गणपती म्हणजेच कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपती यांची मिरवणूक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे.