Maharashtra Breaking News LIVE Updates: वाल्मिक कराडची पवनचक्की कंपनीला हातपाय तोडण्याची धमकी

Diksha Patil Fri, 10 Jan 2025-7:08 pm,

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात काय काय झालं सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रात दिवसभरात काय काय होतंय राजकारणापासून इतर गोष्टींविषयी देखील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर 


 

Latest Updates

  • 'पप्पा, तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा'

    जालनामध्ये सभेत बोलताना दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला अश्रू अनावर झाले. तुम्ही जिथे असाल तिथे हसत राहा असं भरल्या डोळ्यांनी वैभवी देशमुख वडिलांबाबत बोलली. यावेळ ती भावुक झाली. तिच्या या वाक्यानं उपस्थितही हेलावले. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा आणि सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना वैभवी देशमुख भावुक झाली.

     

  • संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा 

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. बार्शी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे, सुरेश धस,संदीप क्षीरसागर, मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत.

     

  • मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट 

    मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील MET या कॉलेजमध्ये छगन भुजबळ यांची भेट घेतली. तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बीड प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना भुजबळ यांनी त्यांना साथ दिली होती. पुरावे नसताना धनंजय मुंडे यांनी राजीनामा का द्यावा असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आज झालेल्या या भेटीला महत्व प्राप्त झालंय. 

     

  • बीड संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. विष्णू चाटेची 4 दिवसांची कोठडी आज संपली. त्यामुळे त्याला केज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी मिळताच CIDनं विष्णू चाटेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. त्याची CID कस्टडी घेण्यासाठी त्याला उद्या सकाळी कोर्टात हजर करणार असल्याचं समजतंय. 

  • ठरलं! बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक 'या' तारखेला लोकांसाठी होणार खुलं 

    Balasaheb Thackeray Smarak : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या वास्तूच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली. या स्मारकाच्या कामाची शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पुढील वर्षी 23 जानेवारी 2026 ला जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसंच स्मारकाचं बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलंय. 

     

  • सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने घरं मिळणार, औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय  

    सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने घरे मिळणार असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा निर्णय दिलाय. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी ही माहिती दिलीये. तसेच वाल्मिकी, रुखी, मेहतर आणि अनुसूचित जाती वगळता इतर जातींना वारसा हक्काने नोकरी देण्यास स्थगिती देण्यात आली आहे...त्याचबरोबर मराठा, ओबीसी आणि इतर जातींच्या वारसांना हक्काची घरे मिळणार असल्याचा मोठा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिलाय.

     

  • नाशिकमध्ये 44 आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना खराब अन्नपुरवठा

    नाशिक मधील 44 आदिवासी आश्रम शाळांना सेंट्रल किचनमधून खराब अन्नाचा पुरवठा केला जात असल्याचा दावा आमदार हिरामण खोसकर यांनी केलाय. या किचनमधून 18 हजार विद्यार्थ्यांना सडका भाजीपाला, किडलेले कडधान्य आणि कच्च्या पोळ्या पुरवल्या जातायेत, असा दावा खोसकरांनी केलाय. त्यांनी मुंडेगावच्या या किचनवर अचानक छापा टाकला. या पाहणीतून हा धक्कादायक प्रकार समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय. या प्रकारणी खोसकरांनी सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. मंत्रालयात बैठक घेऊन दोषींचं निलंबन करणार, असा इशारा खोसकरांनी केलाय.

     

  • शिवसेना UBTअजून झोपेतून जागी व्हायला तयार नाही - अमोल कोल्हे

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अमोल कोल्हेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसवर टीका केलीये. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. शिवसेना UBT अजून झोपेतून जागी व्हायला तयार नाही असा हल्लाबोल कोल्हेंनी केलाय.

     

  • विजय वडेट्टीवारांच्या आरोपांमुळे मविआत भूकंप?

    विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मविआला घरचा आहेर दिलाय. जागावाटपात घातलेल्या घोळाचा फटका बसल्याचं वडेट्टीवार म्हणालेत. जागावाटपचा घोळ दोन दिवसात संपला असता तर प्रचार आणि प्लॅनिंगसाठी वेळ मिळाला असता असं वडेट्टीवार म्हणालेत. अप्रत्यक्षपणे त्यांनी नाना पटोले आणि संजय राऊतांना यासाठी जबाबदार धरलंय. तर राऊतानीही यावर उत्तर देताना काँग्रेसवर खापर फोडलंय. यामुळे काँग्रेस आणि शिवसेना UBTयांच्यातील या आरोप प्रत्यारोपांवरुन मविआत वादाची ठिणगी पडलीये.

     

  • अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही - उद्धव ठाकरे

    पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे असल्याचा संदेश ठाकरेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पक्षात नाराजीचा सूर आळवणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. 

     

  • सर्व जातीच्या...; घरांबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

    सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने घरे मिळणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली माहिती. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा. वाल्मिकी, रुखी, मेहतर व अनुसूचित जाती वगळता इतर जातींना वारसा हक्काने नोकरी देण्यास स्थगिती होती.

  • गोळीबाराच्या घटनेनं जळगाव जिल्हा हादरला

    जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार झालाय. चाळीसगावनंतर आता भुसावळमध्ये तरुणावर गोळीबार करण्यात आला. चहाच्या दुकानात या तरुणावर आरोपीनं 5 राऊंड फायर केले. यात एक तरुण गंभीर जखमी झालाय. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

  • अंधेरीतील बारमध्ये छुप्या घरातून मुली येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल 

    -अंधेरीतील एका बारमध्ये छुप्या घरातून मुली येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    -अंधेरीतील तो बार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांचा असल्याचा दावा केला जातोय

    -ठाकरेंच्या नावावर बार असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय.

    -व्हायरल व्हिडीओ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची माजी खासदार विनायक राऊत यांची सायबर विभागाकडे केलीय.

  • गुंडांना पोलिसांचा धाक नाही

    पुण्यात गुंडांना पोलिसांचा धाक नाही. जामिनावर सुटलेल्या गुंडाची पुण्यात रॅली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांची कारवाई.

  • भाजपमध्ये घरवापसी?

    भाजपमध्ये  प्रवेशासाठी दिग्गज नेते  रांगेत असल्याची माहिती आहे
     - विधानसभेसाठी भाजप सोडणारे घरवापसीच्या तयारीत
     - भाजपमध्ये परतीसाठी भेटीगाठी
     - भाजप घरवापसीचा निर्णय विचार करून घेणार
     - राजन तेली, समरजीत घाटगे, संजय काका पाटील भाजप प्रवेशासाठी रांगेत असल्याची   माहिती सूत्रांना दिलीय.. 

     

  • मुंबईत ठाकरे गटाला धक्का? 

    ठाकरेंच्या माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर. पक्षाकडून विश्वासात घेतलं जात नसल्याची खंत असल्याची सूत्रांची माहिती...

     

  • कॉंग्रेसला जास्त जागा हव्या होत्या - संजय राऊत

    कॉंग्रेसला जास्त जागा हव्या होत्या. कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही फार आग्रहानं मागत होतो. ती जागा शिवसेननं सहावेळ जिंकली होती. विधानसभेत चुकीच्या पद्धतीनं जागा वाटप झालं. कॉंग्रेस केंद्रीय समितीनं हस्तक्षेप. सर्वांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी कॉंग्रेसची.

     

  • जालन्यात आज संतोष देषमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा

    जालन्यात आज संतोष देषमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मोर्चा. देशमुख कुटुंबीयासह संभाजीराजे, जरांगे पाटील आणि सुरेश धस मोर्चात सहभागी होणार.

  • समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकारच

    समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकारच. पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. सुप्रीम कोर्टानं 17 ऑक्टोबर 2023 ला दिलेला निर्णय संविधान पीठातील चर्चेनंतर कायम. 

  • चक्क यूट्युबरनं केली 10 लाखांची चोरी

    नोएडामध्ये 10 लाखांची चोरी करणाऱ्या यूट्यूबरला अटक.. ATM मशीनमध्ये कॅश भरणाऱ्या कंपनीमध्ये यूट्युबरचा डल्ला.

  • दिल्ली निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये फूट

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या आपच्या विजयाबाबतच्या वक्तव्यावरून संदीप दीक्षितांची चव्हाणांवर टीका... आपची धोरणं चांगली तर दिल्लीतील एका जागेवर आपकडून लढावं. 

  • तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत चंद्राबाबू नायडूंकडून आदेश

    तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंकडून आदेश. डिएसपी, गौशाळा संचालकांसह तिघेजण निलबिंत.. दोन अधिकाऱ्यांची बदली, चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू... 

  • ​चित्तोडगडच्या सांवलिया सेठ मंदिरात भाविकांनी केलं रेकॉर्डब्रेक दान

    चित्तोडगडच्या सांवलिया सेठ मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानाचा रेकॉर्डब्रेक विक्रम. सांवलिया सेठला भाविकांकडून 23 कोटी 12 लाख रुपये रोख, 1 किलो सोनं आणि  90 किलो चांदीचं दान

  • वैकुंठ एकादशीनिमित्त त्रिचीच्या रंगनाथस्वामी मंदिरात भाविकांची गर्दी

    वैकुंठ एकादशीनिमित्त त्रिचीच्या रंगनाथस्वामी मंदिरात भाविकांची गर्दी, वर्षातून एकदा उघडलं जातं वैकुंठ द्वार, भगवान रंगनाथांच्या पालखी सोहळ्याची प्रथा

  • ​प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

    प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याला उरले अवघे 2 दिवस, 13 तारखेपासून देशातील सर्वात मोठं महाकुंभ, प्रयागराजमधील तयारी अंतिम टप्प्यात

  • आसामच्या दिमा हसाओ कोळसा खाणीत अडकलेल्या मजुरांचं बचावकार्य सुरूच

    आसामच्या दिमा हसाओ कोळसा खाणीत अडकलेल्या मजुरांचं 4 दिवसांपासून बचावकार्य सुरूच, अद्याप एकाच कामगाराचा मृतदेह सापडला, 8 कामगारांचा शोध सुरू

  • ​वाढती वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातावरून सरकार नवीन वाहन धोरणांच्या तयारीत

    वाढती वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार नवीन वाहन धोरण आणणार. परिवहन विभागाचा 100 दिवसात आराखडा तयार होणार.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link