Gadchiroli Jadutona : गडचिरोलीत दोघांना जिवंत जाळलं

Fri, 03 May 2024-10:46 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • गडचिरोलीत जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह पुरुषाला जिवंत जाळले

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gadchiroli Jadutona : पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी सर्वात मोठी बातमी... गडचिरोलीमध्ये जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळण्यात आलंय... यात एका महिलेचा समावेश आहे.. जमानी तेलामी ही महिला आणि देऊ अटलामी या पुरुषाला जिवंत जाळण्यात आलंय. याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली.. 1 मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी दोघांना मारहाण केली. यानंतर मरणासन्न अवस्थेतल्या या दोघांना गावाबाहेरच्या नाल्यात नेलं.. दोघांवर पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्यात आलं.. धक्कादायक म्हणजे अटक केलेल्यांमध्ये महिलेचा पती आणि मुलाचाही समावेश आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • 20 वर्षांनंतर स्वगृही कुटुंबासोबत परतलोय- संजय निरुपम

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Nirupam in Shivsena : संजय निरुपम यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश.. ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत संजय निरुपम त्यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.. काँग्रेसचा हात सोडून निरुपम शिवसेनेत.. 20 वर्षांनंतर स्वगृही कुटुंबासोबत परतलोय, संजय निरुपम यांची प्रतिक्रिया.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • अपघातात एक कार्यकर्ता किरकोळ जखमी, शरद पवार सुखरूप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalgaon Accident : जळगावमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झालाय. चोपड्यातील सभा आटोपून भुसावळकडं जाताना अपघात झालाय. बुऱ्हाणपूर अंकलेश्र्वर महामार्गावरील वाघोदे गावाजवळ हा अपघात झाला. अचानक गतिरोधक आल्यानं पुढील गाडीनं ब्रेक दाबला. त्यानंतर पाठीमागून येणा-या गाड्या एकमेकांवर आदळल्या. या आपघातात शरद पवार सुखरूप आहेत. मात्र, दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. तर एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झालाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • उत्तर मध्य मुंबईतून तिकीट नाकारल्याने भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन नाराज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Poonam Mahajan is Upset : उत्तर मध्य मुंबईतून तिकीट नाकारल्याने भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन अजूनही नाराज आहेत.. आज उज्ज्वल निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.. त्यावेळी पूनम महाजन गैरहजर होत्या...त्यामुळे त्यांची नाराजी अद्यापही कायम असल्याचा अंदाज लावण्यात येतोय... तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पूनम महाजन इच्छुक होत्या...मात्र, त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध होता.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • फडणवीसांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, पदाधिकारी, नगरसेवक प्रचारापासून दूर असल्याची चर्चा 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune BJP Fadanvis Meeting : पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक.. पुण्यातील भाजप पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांसोबत बैठक.. काही नगरसेवक तसेच पदाधिकारी प्रचारापासून दूर असल्याची तक्रार होती. पुणे, शिरूरसह बारामतीतील लोकसभेच्या प्रचाराचा आढावा घेणार आहेत. ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार संजय काकडे उपस्थित आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • विजय करंजकरांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज, पत्ता कट झाल्याने ठाकरेंवर नाराज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Vijay Karanjkar : ठाकरे गटाच्या विजय करंजकरांनी अखेर बंडखोरी केलीये... त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत मविआची डोकेदुखी वाढवलीये...विजय करंजकर नाशिकमधून महाविकास आघाडीक़डून इच्छुक होते...ऐनवेळी पत्ता कट झाल्याने करंजकरांनी व्यक्त केली होती नाराजी...नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ महायुतीचे हेमंत गोडसे, अपक्ष शांतिगिरी महाराज आणि विजय करंजकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • पांडुरंगाचं दर्शन मिळणार कधी?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pandharpur : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम रखडलंय.. 45 दिवसांची मुदत संपूनही मंदिराचं काम जैसेथेच आहे.. मंदिर समितीसह अध्यक्ष आणि प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होतंय..तर ठेकेदाराकडून चालढकलपणा सुरु आहे.. त्यामुळे भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं गाभा-यातून दर्शन घेता येत नाहीये.. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उमेदवारी नाकारल्यानं राजेंद्र गावित नाराज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Palghar Rajendra Gavit : उमेदवारी नाकारल्यानं पालघर लोकसभा मतदारसंघात खासदार राजेंद्र गावित नाराज झालेत.. झालेला प्रकार हा निराशा जनक असल्याचं त्यांनी म्हटलंय..  कार्यकर्ते ही नाराज झाल्याचं गावितांनी यावेळी सांगीतलंय. नाराज असलो तरी महायुतीचा घटक म्हणून कार्यकर्ते हेमंत सावरांना मदत करतील असं आश्वासन त्यांनी दिलंय.. मात्र आज उमेदवारी अर्ज भरताना काढण्यात येणा-या रॅलीत हजर राहणार नाही अशी भूमीका गावितांनी  घेतलीये.... दरम्यान राजेंद्र गावितांची नाराजी  दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.. राजेंद्र गावित यांचं आता राज्यात पुनर्वसन केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विठ्ठल सहकारी कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Abhijeet Patil : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेण्यात आलीय.. काल झालेल्या सुनावणीत साखर गोडाऊनला केलेलं सील काढायला एमएससी बँकेनं डीआरटी कोर्टात परवानगी दिलीय.. त्यामुळे अभिजित पाटील यांच्या कारखान्याला क्लीन चीट मिळालीय.. नुकताच अभिजीत पाटील यांनी माढामध्ये रणजितसिंह निंबाळकरांना पाठिंबा दिला होता, त्यानंतर त्यांच्या कारखान्यावरील कारवाई मागे घेण्यात आलीय.. आता 5 मेला दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारखान्यात मेळावा घेणार आहेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Supriya Sule & Sunetra Pawar : बारामतीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिका-यांनी नोटीस बजावलीये.. निवडणुकीच्या दैनंदिन खर्चाबाबत ही नोटीस आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडून सादर करण्यात आलेला खर्च आणि निवडणूक विभागाच्या निदर्शनात आलेला खर्च यामध्ये तफावत असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलंय.. त्यावर दोन दिवसांत स्पष्टिकरण देण्यास सांगण्यात आलंय.. समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास निवडणूक खर्चामध्ये दिसून येणारी तफावत प्रत्यक्ष खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल असं नोटीसीद्वारे कळवण्यात आलं आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नागपुरात भाजप आणि काँग्रेस आमनेसामने

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur BJP Vs Congress : नागपुरातील मतदार यादीतील घोळावरून भाजप-काँग्रेस आमने-सामने आलेयत...मविआ सरकार असताना मविआमधील नागपुरातील मंत्र्यांनीच नागपुरातील मतदार यादीत घोळ घातल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय...मात्र काँग्रेसने भाजपचा हा आरोप फेटाळून लावत पराभवाच्या भीतीनेच भाजप आमदार असा आरोप करत असल्याचं काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी म्हटलंय...नागपुरात मतदान घटल्याने मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप भाजपने केला होता...त्याची चौकशी करून अधिका-यांवर कारवाईची मागणी केली होती...त्यावरून आता भाजपने मविआवर आरोप केलाय...तर काँग्रेसने आरोप फेटाळून लावलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बच्चू कडू यांचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या प्रहार शिक्षक संघटनेनं बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केलाय. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन मिळाल्याचं सांगत सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. अमरावतीत महायुतीविरोधात बच्चू कडूंनी शड्डू ठोकलाय, आता बारामतीतही सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याची भूमिका बच्चू कडूंनी घेतलीय. बच्चू कडू महायुतीचे घटक असतानाही अमरावती आणि बारामतीत विरोधी भूमिका घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thane Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय...अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर 5 कोटींची खंडणी आणि मारहाण केल्याप्रकरणी मुंबईच्या एल टी मार्ग खंडणी विभागात गुन्हा दाखल झालाय...सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी तक्रार केली होती...त्या तक्रारीवरून अविनाश जाधवांवर खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार आहेत...तर अमेठीतून के.एल शर्मा काँग्रेसकडून निवडणूक लढणार आहेत...सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढायच्या...मात्र, आता त्या राज्यसभेवर गेल्यानं राहुल गांधी रायबरेलीतून लढणार आहेत...आज राहुल गांधी शक्तिप्रदर्शन करत रायबरेलीतून अर्ज भरणार आहेत...तर के एल शर्मा हे अमेठीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत...के.एल शर्मा यांची लढत ही स्मृती इराणींसोबत होणाराय...तर प्रियांका गांधी निवडणूक लढणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय...

    बातमी पाहा - Loksabha Election 2024 : सस्पेंस संपला! काँग्रेससाठी रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीतून 'या' नेत्याची उमेदवारी निश्चित

  • महायुतीचे उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election : महायुतीचे उमेदवारांच्या उमेदवारांची आज अर्ज भरण्याची लगबग दिसून येतेय. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम उमेदवारी अर्ज भरतील. त्यांची लढत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी होतेय. शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकरही आज अर्ज भरतील. ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर त्यांच्याविरोधात आहेत. दक्षिण मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय. याठिकाणी अरविंद सावंत आणि यामिनी जाधव एकमेकांसमोर आहेत. यामिनी जाधव आज अर्ज भरतील. तिकडे ठाणे आणि भिवंडीतून नरेश म्हस्के आणि कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील. नरेश म्हस्केंविरोधात राजन विचारे मैदानात आहेत. तर भिवंडीत कपिल पाटलांविरोधात सुरेश म्हात्रे रिंगणात आहेत. पालघरमध्ये भाजपनं डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या भारती कामडी रिंगणात आहेत.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संजय निरुपम यांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Nirupam : संजय निरुपम यांचे अखेर ठरलाय.. आज निरुपम एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत..  ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी त्यांच्या प्रक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत संजय निरुपम त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करतील..  काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर निरुपम काय भूमिका घेणार याकडे सा-यांचं लक्ष लागलं होतं.. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती... अखेर त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ठाकरे गट रायगड जिल्हाप्रमुख गाडीवर हल्ला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raigad Attack : शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला झालाय. मुंबई गोवा महामार्गावर टेमपाले ते वीरच्या दरम्यान गाडीवर दगडफेक करण्यात आलीय...या हल्ला प्रकरणी विकास गोगावलेंसह 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा विकास गोगावलेंवर दाखल करण्यात आलाय...या हल्ल्यात चालक किरकोळ जखमी झालाय...मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पुढे पळवली...त्यामुळे गाडीतील सर्वजण बचावले...या हल्ल्यात गाडीचं मोठं नुकसान झालंय. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाड येथील सभा आटोपून नवगणे परत इंदापूर इथं आपल्या घरी जात असताना रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला...हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्या चिथावणीवरून झाला आणि हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले हजर होते असा आरोप नवगणेंनी केलाय...

    बातमी पाहा - रायगडमध्ये राडा! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, गाडी फोडली; गोगावलेंच्या मुलावर आरोप

  • बारामतीत अजित पवार, देवेंद्र फडणवीसांची आज प्रचारसभा

     

    Loksabha Election : बारामती... लोकसभा निवडणुकीतला हायहोल्टेज मतदारसंघ... इथं नणंद विरुद्ध भावजय लढतीत कोण बाजी मारणार? सुप्रिया सुळे हॅटट्रिक साधणार की सुनेत्रा पवार त्यांना मात देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यासाठी मविआ आणि महायुतीच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावलाय. कालच्या पवारांच्या सभांनंतर आज अजितदादा आणि देवेंद्रफडणवीस जाहीर सभा घेतायत. संध्याकाळी वारजे माळवाडी इथं सुनेत्रा पवारांसाठी सभा असणारेय. इथं अजित पवार आणि फडणवीस काय तोफ डागतात याकडे लक्ष असेलं. 

  • अमित शाह यांची रत्नागिरी आणि सांगलीत प्रचारसभा

     

    Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौ-यावर आहेत. रत्नागिरी आणि सांगली अशा दोन सभा ते घेणारेत. भाजप उमेदवार नारायण राणेंसाठी ते रत्नागिरी-सिंधुदुर्गात येतायत. नारायण राणेंना विनायक राऊतांचं आव्हान असणारेय. रत्नागिरीनंतर अमित शाह सांगलीत सभा घेतील. इथं भाजपचे उमेदवार संजयकाका पाटलांसाठी विट्यात सभा आयोजित करण्यात आलीय.

  • पुण्यात राहुल गांधींची प्रचारसभा

     

    Pune Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा होणारेय. मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संज्योत वाघेरे यांच्यासाठी राहुल गांधी पुण्यात सभा घेतायत. इथल्या SSPMS  मैदानावर ही सभा होणारेय. पुण्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मोठी टीका केली होती. या टीकेला राहुल गांधी काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link