First victim of Heat Stroke : राज्यात उष्माघाताचा पहिला बळी

Tue, 16 Apr 2024-10:44 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • पालघरमध्ये उन्हामुळे भोवळ आल्यानं 16 वर्षीय मुलीचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    First victim of Heat Stroke : पालघरमध्ये एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा उष्माघातामुळे पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विक्रमगड मधील केव वेडगे पाडा येथील अश्विनी विनोद रावते या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा आज दुपारच्या सुमारास उष्माघाताने मृत्यू झाला  अश्विनी ही मनोर मधील एस.पी.मराठी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती. आज अश्विनी अकरावीचा पेपर देऊन घरी परतल्यानंतर घरी कोणी नसल्याने ती आई वडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेली होती.. तिथेच तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोसळली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • दाभाडीत चिंतन बैठकीत भाजप कार्यकर्त्यांची हाणामारी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Malegaon BJP Rada : मालेगावात भाजप विरोधात असलेल्या चिंतन सभेत भाजप कार्यकर्त्यांनी राडा घातलाय. दाभाडीत करणी सेनेच्या कार्यक्रमाचे आयोजन दाखवून भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात चिंतन सभा होती. सभेत लावलेल्या बॅनरवरून राडा झाला. बैठकीत धुळ्याचे अनिल गोटे, डॉ. विलास बच्छाव, श्याम सनेर यांच्यासह आणि काँग्रेसच्या नाराज गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात- सुनेत्रा पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sunetra Pawar on Family Relation : निवडणुकीच्या काळानंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात... असं सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केलंय... मूळ पवार यावरून दावे-प्रतिदावे आणि वैयक्तिक टिप्पणी सुरूये... त्यावर बोलताना सुनेत्रा पवार यांनी हे विधान केलंय... निवडणुकीच्या काळात दावे-प्रतिदावे आणि वैयक्तिक टिप्पणी होत असते असं त्या म्हणाल्या.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • UPSCत महाराष्ट्रातून अनिकेत हिरडे, प्रियांका मोहिते चमकले

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    UPSC Result : UPSCचा निकाल जाहीर झालाय. देशात तब्बल 1 हजार 16 उमेदवार उत्तीर्ण झालेत. अनिकेत हिरडे, प्रियांका मोहिते हे मराठी उमेदवार UPSCत चमकलेत. अनिकेतनं 91वी तर प्रियांका मोहितेनं 595 वी रँक पटकावलीय. 347 उमेदवार खुल्या प्रवर्गातून...303 उमेदवार ओबीसी प्रवर्गातून.... तर 165 उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातून उत्तीर्ण झालेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानच्या निवासस्थानी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    CM Shinde will Meet Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर तातडीने तपास चक्र फिरली...मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलिसांना सूचना करत सलमानची सुरक्षा व्यवस्थाही वाढवली....लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री हजेरी लावत आहेत...त्यात वेळातवेळ काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. यापूर्वी गोळीबार झाला त्या दिवशी सलमान खानचे मित्र आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलमानची घरी जाऊन भेट घेतली होती.

     

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानच्या निवासस्थानी जाऊन घेणार भेट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    CM Shinde will Meet Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर तातडीने तपास चक्र फिरली...मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलिसांना सूचना करत सलमानची सुरक्षा व्यवस्थाही वाढवली....लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री हजेरी लावत आहेत...त्यात वेळातवेळ काढून मुख्यमंत्री शिंदे सलमान खानच्या निवासस्थानी  जाऊन त्याची भेट घेणार आहेत...यापूर्वी गोळीबार झाला त्या दिवशी सलमान खानचे मित्र आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलमानची घरी जाऊन भेट घेतली होती.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • जागावाटप पूर्ण झालंय, बंडखोरी थांबवावी - उद्धव ठाकरे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray On Vishal Patil : सांगलीतून काँग्रेस नेते विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीत तणाव वाढलाय. तिन्ही पक्षांच्या अधिकृत जागावाटप झाल्यात... जर कोणी बंडखोरी करत असेल तर त्या त्या पक्षानं त्या थांबवाव्यात, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलाय. गद्दारी थांबवणं त्या पक्षाची जबाबदारी आहे, असे ठाकरेंनी म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विशाल पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Balasaheb Thorat & Sanjay Raut On Vishal Patil : विशाल पाटलांची मनधरणी करु असा सूर मविआच्या नेत्यांनी लावलाय.. सांगलीची जागा काँग्रेसची नैसर्गिक जागा आहे.. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असणं साहजिक आहे.. मात्र विशाल पाटील चुकीचं पाऊल उचलणार नाही याची काळजी घेऊ.. अशी भूमिका बाळासाहेब थोरातांनी घेतलीय.. तर वसंतदादा पाटलांनी कधीच काँग्रेसशी बेईमानी केली नाही..ती परंपरा सोडून विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार नाहीत.. असं संजय राऊतांनी म्हटलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 26 एप्रिलला सुनावणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thackeray Vs Shinde : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 26 एप्रिलला सुनावणी होणार आहे....विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार आहे...राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र केले नाही म्हणून ठाकरे गटाने याचिका दाखल केलीय...तर मुंबई हायकोर्टात सुनावणी घेण्यासाठी शिंदे गटाने याचिका दाखल केलीय...या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात की हायकोर्टात सुनावणी होणार हे 26 एप्रिलला स्पष्ट होणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Salman Khan Update : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणा-या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीये.. दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.. गुजरातच्या भुजमधून त्यांना आता मुंबईत किला कोर्टात हजर करण्यात आलंय...त्याआधी दोघांची वैद्यकीय तपासणीसाठी जीटी रुग्णालयात करण्यात आली....विशाल ऊर्फ कालू आणि सागर पाल अशी या दोघांची नावं आहेत....या आरोपींकडून विदेशी पिस्तुलसह जिवंत काडतुसं, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलीये. मुंबईच्या गुन्हेशाखेनं गुजरातमध्ये जाऊन ही कारवाई केलीये..रविवारी पहाटे या दोघांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गेलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सांगलीत विशाल पाटील यांचं शक्तिप्रदर्शन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangli Vishal Patil : सांगलीत विशाल पाटलांच्या रॅलीला सुरुवात झालीय, शक्तिप्रदर्शन करत विशाल पाटील भूमिका जाहीर करणार आहेत.. विशाल पाटलांच्या रॅलीत मोठा जनसमूह लोटल्याचं दिसतंय.. मविआतला सांगलीचा वाद चिघळलाय...19 तारखेला 3 वाजेपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा विशाल पाटलांनी व्यक्त केलीय...विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्यास चंद्रहार पाटलांची डोकेदुखी वाढण्याची शक्यताय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उदयनराजे भोसले यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Udayanraje Bhosale On Sharad Pawar : शरद पवारांनी केलेल्या टीकेवर उदयन राजे भोसलेंनी आज प्रत्युत्तर दिलंय.. आपल्या जिल्ह्याचे प्रश्न बारामतीत सोडवावे लागतात त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटल्याची टीका उदयनराजेंनी केलीये.. बाहेरच्यांनी आपल्या जिल्ह्यात येऊन सांगू नये असा पलटवारही उदयनराजेंनी केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : सातारामधून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय...साता-याच्या जागेवर भाजपकडून उदयनराजे राजेंना उमेदवारी देण्यात आलीय...उदयनराजेंसमोर आता मविआच्या शशिकांत शिंदेंचं आव्हान असणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • एसी सरकार समूहाचा महाराष्ट्रात शिरकाव

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    AC Sarkar : समांतर सरकारचा दावा करणारी संघटना 'एसी सरकार' समुहाचा महाराष्ट्रात शिरकाव झालाय.. या समुहानं थेट नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्या समुहाचा स्तंभ उभारलाय.. थेट शिलालेख उभारल्यानं एकच खळबळ माजलीय.. शिलालेख स्तंभ उभारल्यानं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी परिसरात हातपाय पसरण्याचा या समुहाचा प्रयत्न मानला जातोय.. एसी सरकार समूह भारत सरकारला मानत नाही, ब्रिटनच्या राणीला आपली राणी मानतात.. नाशिक-गुजरातच्या सीमा भागात डांग परिसरात हा समूह सक्रिय आहे..  त्यामुळे सरकार आणि पोलिस काय कारवाई करतायत याकडे लक्ष लागलंय..

    बातमी पाहा - महाराष्ट्रात 'एसी सरकार'चा शिरकाव, त्र्यंबकेश्वरमध्ये उभारला स्तंभ; काय आहे नेमकं प्रकरण?

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 1 महिना 13 दिवसांत 4658 कोटी रुपये जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Election Commission : लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई निवडणूक आयोगानं केलीय. 1 मार्च ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत देशभरातून सुमारे 4658 कोटी रुपये निवडणूक आयोगाने जप्त केलेत. यात रोख रक्कम, सोनं-चांदी, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आयोगाने 3475 कोटी रुपये जप्त केले होते.. मात्र यंदा अवघ्या 1 महिना 13 दिवसातली जप्तीची रक्कम ही 2019 च्या पूर्ण निवडणुकीतील जप्तीच्या रक्कमेपेक्षा अधिक आहे..आयोगाच्या म्हणण्यानुसार या रकमेचा अंदाज काढला तर दररोज 100 कोटी रुपये जप्त केले जातायत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मिशन 45साठी भाजप आमदारांना टार्गेट-सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : मिशन 45 साठी भाजपचे वरिष्ठ नेते कामाला लागलेत.. टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजप आमदारांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. महायुतीचा प्रत्येक खासदार निवडून आणण्यासाठी प्रत्येक आमदाराला विधानसभा क्षेत्रातून मताधिक्य द्यावं लागणार आहे. तशा सूचनाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना दिल्यात. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता ज्यांना पुन्हा आमदारकीचे तिकीट हवंय त्या सर्वांना आपल्या मतदारसंघातून लीड देणं बंधनकारक असणार आहे.. त्यामुळे एखाद्या उमेदवाराबाबत कितीही नाराजी असली तरी स्वतःला पुन्हा आमदारकीचं तिकीट मिळावे यासाठी तरी आमदारांना काम करावे लागणार आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मोदींची लाट आहे या भ्रमात राहू नका - नवनीत राणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Navneet Rana : एकीकडे देशात मोदींच्या नावानं मतं मागितली जातायत, मोदी लाट असल्याचा दावा भाजप कार्यकर्ते करतायत.. दुसरीकडे नवनीत राणांनी मात्र भलतंच विधान केलंय. मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका.. मोदी लाटेत मी अपक्ष म्हणून निवडून आले होते.. असं विधान नवनीत राणांनी केलंय. त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • VVPAT मतदान प्रक्रियेबद्दल आज महत्त्वाची सुनावणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    VVPAT : VVPAT मतदान प्रक्रियेबद्दल आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मतदानानंतर VVPAT पावती दाखवण्याच्या प्रक्रियेवर याचिकेतून संशय व्यक्त करण्यात आलाय. मतमोजणी VVPAT पावत्यांवरुन करण्याची मागणी करण्यात आलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • माढा आणि सोलापूरचे उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : माढा आणि सोलापुरातील उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत...शरद पवार गटात नुकताच प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटील आज माढामधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत...तर त्यांच्याविरोधात उभे असलेले रणजितसिंह निंबाळकरही आजच अर्ज दाखल करणार आहेत...सोलापुरातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे फडणवीसांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बारामतीत अजित पवार पर्यायी उमेदवार-सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Baramati Ajit Pawar : बारामतीत अजित पवार हे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद झाल्यास खबरदारी म्हणून पर्यायी उमेदवार अजित पवार अर्ज भरणार आहेत...बारामती लोकसभेसाठी महायुतीकडून विशेष खबरदारी घेतली जातेय...बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलीय...त्या येत्या 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत...असं असताना उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नावे देखील अर्ज नेण्यात आलाय...त्यामुळे बारामती मध्ये अजित पवार हे डमी उमेदवार असण्याची शक्यता आहे...बारामतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक बनलीय...अशा परिस्थितीत उमेदवारीबाबत महायुतीकडून विशेष खबरदारी घेण्यात येतेय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raigad Rain : रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलंय... माणगाव आणि पोलादपूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय...पावसामुळे आंब्याची फळगळती होण्याची शक्यता आहे.. अचानक आलेल्या पावसाने वीटभट्टी मालकांचेही नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे कर्जतमध्येही जोरदार पाऊस कोसळला.... सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेलू रेल्वे स्थानकाजवळचं पत्रा शेड उडालंय.....यामुळे ओव्हरहेड वायर तुटली....त्याचा परिणाम कर्जतकडे येणारी रेल्वे वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती....झाला. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे अटकेत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Salman Khan Update : दबंग खान सलमानच्या घरावर गोळीबार करणा-या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीये.. गुजरातच्या भुजमधून या दोघांना अटक करण्यात आलीये...विशाल ऊर्फ कालू आणि सागर पाल अशी या दोघांची नावं आहेत.... तो गॅगस्टर रोहित गोदाराचा खास सहकारी म्हणून ओळखला जातो. कालू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येसह अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या आरोपींकडून विदेशी पिस्तुलसह जिवंत काडतुसं, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलीये. मुंबईच्या गुन्हेशाखेनं गुजरातमध्ये जाऊन ही कारवाई केलीये.. रविवारी पहाटे या दोघांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गेलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता.  या दोघांनाही गुजरात भुज शहरातून अटक करण्यात आली असून त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे. या दोघांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link