महाराष्ट्रात 'एसी सरकार'चा शिरकाव, त्र्यंबकेश्वरमध्ये उभारला स्तंभ; काय आहे नेमकं प्रकरण?

समांतर सरकारचा दावा करणारी संघटना 'एसी सरकार' समुहाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे.  या समुहाने थेट नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्या समुहाचा स्तंभ उभारला आहे. स्तंभ उभारल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 16, 2024, 11:34 AM IST
महाराष्ट्रात 'एसी सरकार'चा शिरकाव, त्र्यंबकेश्वरमध्ये उभारला स्तंभ; काय आहे नेमकं प्रकरण? title=

समांतर सरकारचा दावा करणारी संघटना 'एसी सरकार' समुहाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे.  या समुहाने थेट नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्या समुहाचा स्तंभ उभारला आहे. स्तंभ उभारल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शिलालेख स्तंभ उभारल्यानं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी परिसरात हातपाय पसरण्याचा या समुहाचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे.
 
एसी सरकार समूह भारत सरकारला मानत नाही. तसंच ब्रिटनच्या राणीला आपली राणी मानतात. नाशिक-गुजरातच्या सीमा भागात डांग परिसरात हा समूह सक्रिय आहे. त्यांनी स्तंभ उभारल्यानंतर आता राज्य सरकार आणि पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

नुकतंच गडचिरोली जिल्ह्यात या एसी सरकारविरोधात एक गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांना विरोध केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यातच आता हा स्तंभ उभारण्यात आला आहे. 

स्थानिक पुरोहितांनी ब्रह्मगिरीवर कोणतंही बांधकाम करु नये यासाठी आधीच आपला विरोध दर्शवला आहे. यानंतर त्यांनी स्तंभांचं काम रोखलं होतं. पण आता मोठा स्तंभ उभारण्यात आला आहे. 100 ते 150 लोकांनी येऊन हा स्तंभ उभारल्याची माहिती मिळत आहे. सरकारविरोधात पाऊल उचलणाऱ्या या एसी सरकारला वेळीत रोखण्याचं आव्हान आता राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर आहे. 

काय आहे नेमकं एसी सरकार?

- A/C भारत सरकार हा आदिवसींचा समुदाय आहे. 
- स्वत:ला भारताचा खरा शासनकर्ता म्हणवतो
- केंद्रात आणि राज्यात असलेल्या सरकारला फक्त संस्था मानतो. 
- दक्षिण गुजरात आणि नंदुरबारमध्ये समुदायाचं वास्तव्य
- या समुदायातील लोक मुख्यत: निसर्गाचे पूजक आहेत. 
- 'A/C भारत सरकार' ही 12 लोकांची मुख्य समिती आहे. 
- मुख्य समितीला कंसिलेशन कमिटी म्हणतात. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x