Jarange on Bhujbal : बीडच्या सभेतून जरांगेंचा भुजबळांना इशारा

Sat, 23 Dec 2023-8:56 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • येवल्याच्या यडपटानं मराठ्यांच्या नादी लागू नये.. जरांगेंचा भुजबळांना इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jarange on Bhujbal : येवल्याच्या यडपटानं मराठ्यांच्या नादी लागू नये... आरक्षण मिळूदेत कचका दाखवतो.. बीडच्या सभेतून जरागेंनी भुजबळांना इशारा दिला.. मराठा आमदार, खासदारांनी पाठीशी राहावं..  नाही तर मराठ्यांची घरं तुमच्यासाठी बंद होतील असं म्हणत जरांगेंनी
    सरकारला टोला लगावला.. तर अशा कोल्हेकुईला दाद देत नाही, जरांगेंच्या जन्माआधीपासून लढत आलोय असा पलटवार भुजबळांनी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार- जरांगे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange's Announcement : बीडच्या इशार सभेतून मनोज जरांगे पाटलांनी मोठी घोषणा केलीय, 20 जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानात उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केलीय. बीडच्या सभेतून जरांगेंनी मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवलीय. कुणीही हिंसक आंदोलन करायचं नाही, कुणी दंगा करायला लागलं तर त्याला पोलिसांकडे द्या असं आवाहानही जरांगेंनी केलंय.. तर मराठा खासदार, आमदारांनी पाठीशी राहावं, नाही तर त्यांना आमची घरं बंद होतील, असा इशाराही जरांगेंनी दिलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • मराठा आरक्षणावरची सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maratha Curative Petition : मराठा आरक्षणावर सरकारनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने ही तारीख दिली आहे. सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका स्वीकारली असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • जम्मू-काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    4 Terrorists Killed in Jammu and Kashmir : भारत पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडलाय.. जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काही पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करत होते.. यावेळी भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'फेब्रुवारीत महाविकास आघाडीत फूट पडेल', चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chandrashekhar Bawankule : फेब्रुवारीत महाविकास आघाडीत फूट पडेल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.. भाजपच्या विचारधारेवर काम करण्यास जो तयार आहे त्याचं पक्षात स्वागत होईल असंही त्यांनी यावेळी सांगीलतंय.. पाहुयात बावनकुळे नेमकं काय म्हणालेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'न्याय व्यवस्थेवर दबाव असल्यानं केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई',  संजय राऊतांचा गंभीर आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut on Sunil Kedar : भाजपच्या अनेक नेत्यांवर कारवाईची गरज आहे... मात्र न्याय व्यवस्थेवर दबाव असल्यानं केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.. सुनिल केदारांच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी आहे असं यावेळी राऊत म्हणालेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अवजड वाहनांना बंदी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Pune Express Highway Ban : नाताळ सणानिमित्त मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर शनिवारी ते सोमवार अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलीय. दुपारी 12 वाजेपर्यंत ही बंदी असणारेय. सलग आलेल्या सुट्ट्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईहून पुण्याकडं येणाऱ्या लेनवर बंदी घालण्यात आलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • गुजरातमधील दारूबंदी हटवली?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gujarat Govt Allows Liquor Sale : गुजरातच्या बिझनेस गिफ्ट सिटीतील दारूबंदी हटवण्यात आलीय...गुजरातमध्ये 63 पूर्वी करण्यात आलेल्या दारूबंदीच्या निर्णयात सरकारने बदल केलाय...राजधानी गांधीनगरजवळील बिझनेस गिफ्ट सिटीतील दारूबंदी हटवली असून, व्यावसायिक, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय...हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये दारू पिण्याची मुभा देण्यात आली आहे. 1960 मध्ये गुजरात महाराष्ट्रातून वेगळा झाला...तेव्हापासून या राज्यात दारूबंदी आहे...काँग्रेस, भाजप सरकारनंदेखील हा निर्णय बदलला नाही...मात्र, व्यावसायाच्या पार्श्वभूमीवर दारूबंदीचा निर्णय हटवण्यात आलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'भुजबळांच्या डोक्यात मराठ्यांविषयी विष', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना टोला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange on Chhagan Bhujbal : भुजबळांच्या डोक्यात मराठ्यांविषयी विष असून, भुजबळांचे विचार खालच्या दर्जाचे असल्याचं जरांगेंनी म्हटलंय...भुजबळांनी मराठ्यांच्या नादी लागू नये अशा इशारा जरांगेंनी दिलाय...सरकारने जरांगेंचं ऐकायला पाहिजे, नाहीतर जरांगे मोर्चा घेऊन येतील असा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावला होता...त्यावर जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • काँग्रेस नागपुरातून लोकसभेच्या प्रचाराचं बिगुल फुंकणार 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Congress Rally : काँग्रेस नागपुरातून लोकसभेच्या प्रचाराचं बिगुल फुंकणार आहे.. 28 डिसेंबरला काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे.. या दिवशी नागपूरमध्ये काँग्रेस पक्षानं महारॅली आयोजित केलीये.. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे या सभेला हजर राहणार आहेत.. दिघोरी नाका, उमरेड रोड येथील‎ 80 एकरांच्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात‎ आलंय..‎ या महारॅलीच्या ‎तयारीला फक्त पाच दिवस उरले आहेत. अवघ्या पाच‎ दिवसांत दहा लाखांची गर्दी जमवण्याचे आव्हान‎ काँग्रेससमोर आहे. भाजपविरोधातील काँग्रेसची ही सभा विक्रमी असून त्यातून कार्यकर्त्यांना दिशा मिळेल असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • आमदार बच्चू कडूंनी घेतली मनोज जरांगेंची भेट 

     

    Bacchu Kadu met Manoj Jarang : आमदार बच्चू कडूंनी मनोज जरांगेंची भेट घेतली...इशारा सभेआधी जरांगे आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा झालीय...सरकारच्या सगे सोयरे या शब्दावर जरांगे ठाम आहेत...त्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय

  • मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Railway Megablock : रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणारेय. रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज बोरिवली – भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणारेय. रात्री १२.३५ ते पहाटे ४.३५ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणारेय. मात्र उद्या दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसणारेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • सुनील केदारांची आमदारकी रद्द होणार?

     

    Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार असल्याची सूत्रांची माहिती. नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले. केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय..

  • 'बारामती लोकसभेला योग्य उमेदवार देऊ', अजित पवारांचं वक्तव्य

     

    Ajit Pawar : बारामती लोकसभेला योग्य उमेदवार देऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय...सध्या बारामती लोकसभेच्या खासदार या सुप्रिया सुळे आहेत...त्यामुळे सुप्रिया सुळेंविरोधात योग्य उमेदवार कोण? याचीच चर्चा सुरू झालीय...

  • लोकसभेसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा समिती स्थापन 

     

    Congress : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केलीय...या समितीत देशभरातील 16 सदस्य आहेत...मात्र, महाराष्ट्रातल्या एकाहनी नेत्याला समितीत स्थान मिळालेलं नाही...पी चिदंबरम जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असून, समितीत प्रियांका गांधींनाही स्थान देण्यात आलंय...छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी एस सिंगदेव यांना समितीचे निमंत्रक बनवण्यात आलंय...

  • मुंबईत धुलिकणांचे प्रमाण वाढले

     

    Mumbai Air Pollution :  मुंबईत धुलिकणांचं प्रमाण वाढलंय.. त्यामुळे हवेची गुणवत्ता आणखीन खालावलीये.. देवनारची हवा अतिवाईट आहे.. सायन, मालाड, बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समधील हवाही वाईट असल्याची नोंद झालीये.. दरम्यान पुढील दोन दिवसात मुंबईत ढगाळ वातावरण असल्यानं मुंबईकरांना थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे... मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रीम पाऊस पाडण्यात येणार आहे.. त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्यात.
     

  • बीडमध्ये मनोज जरांगेंची आज निर्णायक इशारा सभा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : बीडमध्ये मनोज जरांगेंची आज निर्णायक इशारा सभा होणार आहे...दुपारी 1 वाजता ही सभा होणार आहे...या सभेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांकडून 125 मराठा आंदोलकांना नोटीसा पाठवण्यात आल्यायत...बीड बाय पासवर ही सभा होणार असून, 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे ठाम आहेत...आता फक्त उद्याचा दिवस उरलाय...त्यामुळे आज जरांगे काय निर्णय घेणार...? आंदोलनाची पुढची दिशा काय असेल...? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दुप्पटीनं वाढ 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Covid 19 Update : देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दुप्पटीनं वाढ झालीये.. काल दिवसभरात कोरोनाचे 640 नवे रुग्ण आढळून आलेत.. याशिवाय देशात JN.1 या नव्या व्हेरियंटचेही 22 रुग्ण आढळून आलेत.. त्यामुळे सर्वांची चिंता वाढलीये.. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे केरळमध्ये आढळतअसून काल केरळमध्ये कोरोनाचे 265 रुग्ण आढळून आलेत.. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय... कोरोनाचा धोका वाढू लागल्यानं राज्य सरकरही अलर्ट झालंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link