PM Modi on Congress : कोल्हापूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Sat, 27 Apr 2024-9:27 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • श्रीराम मंदिराचं निमंत्रण नाकारून काँग्रेसकडून सनातनचा अपमान- मोदी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    PM Modi on Congress : कोल्हापूरच्या सभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल... काँग्रेस देशावर राग काढत आहेत.. काँग्रेस सरकार आलं तर CAA रद्द करणार असं पंतप्रधान मोदी म्हणाले.. एक वर्ष एक पंतप्रधान काँग्रेसचा फॉर्म्युला असल्याचं मोदींचं वक्तव्य.. तर श्रीराम मंदिराचं निमंत्रण नाकारून काँग्रेसने सनातनचा अपमान केला असल्याचं मोदींचं विधान... काँग्रेसची अवस्था फार बिकट असल्याचं मोदींचं वक्तव्य.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • पंतप्रधान मोदींकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Modi, Shinde on Uddhav Thackeray : कोल्हापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलंय. तर बाळासाहेबांचा परिवार काँग्रेसला मतदान करणारेय. यामुळे बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील असा हल्लाबोल शिंदे यांनी केलाय.

     

  • उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ujjwal Nikam Candidature : उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलीय.. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केलीय.. तेव्हा वर्षा गायकवाड यांच्याविरोधात उज्ज्वल निकम मैदानात उतरणार आहेत. भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट त्यामुळे कापलंय.. त्यांच्याऐवजी उज्ज्वल निकम रिंगणात आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • केंद्र सरकारकडून 6 देशांत कांदा निर्यातीला परवानगी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Onion Export Allowed : निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केलीये. कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली असून, 99 हजार 150 मोट्रीक टन कांदा निर्यात करता येणारे. सहा देशांमध्ये कांदा निर्यात होईल.. बांग्लादेश, युएई, भूतान, बहरीन मॉरिशस आणि श्रीलंकेत होणार कांदा निर्यात. तर 2 हजार मेट्रीक टन कांदा मीडल इस्ट आणि काही युरोपियन देशांत निर्यात केला जाणारे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अजित पवारांचा 'झी २४ तास'वर गौप्यस्फोट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar Exclusive Interview : सख्खे भाऊ श्रीनिवास पवार विरोधात का गेले? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय.. झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत ते बोलत होते. बारामतीचा उमेदवार बदलण्याची मागणी भावानं केली... उमेदवार बदल, सोबत राहिन असं त्यांनी सांगितलं, असा गौप्यस्फोट अजितदादांनी केलाय. दरम्यान, कोण उमेदवार द्यायचा हा आमचा अधिकार आहे, असंही अजितदादांनी यावेळी स्पष्ट केलं

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उपमुख्यमंत्री अजित पवार 'झी २४ तास'च्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत भावुक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar Exclusive Interview : सख्खे भाऊ श्रीनिवास पवार विरोधात का गेले? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय.. झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत ते बोलत होते. बारामतीचा उमेदवार बदलण्याची मागणी भावानं केली... उमेदवार बदल, सोबत राहिन असं त्यांनी सांगितलं, असा गौप्यस्फोट अजितदादांनी केलाय. दरम्यान, कोण उमेदवार द्यायचा हा आमचा अधिकार आहे, असंही अजितदादांनी यावेळी स्पष्ट केलं.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मालेगावमध्ये स्वाईन फ्लूनं 2 जणांचा मृत्यू

     

    Malegaon Swine Flu : नाशिकच्या मालेगावमध्ये स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव झालाय.. मालेगावातील एका माजी कृषी अधिकारी आणि एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे... या घटनेनंतर मालेगाव महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झालाय. स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांची देखील आरोग्य तपासणी केली जात आहे... कोणालाही सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने मनपाच्या आरोग्य केंद्र येथे जाऊन उपचार घ्यावे असे आवाहन मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे

  • पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे नेते अमित ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत...महायुतीच्या प्रचारासाठी 29 एप्रिलला पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा होणारेय...या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत...पुणे, मावळ, बारामती आणि शिरूर लोकसभेसाठी मोदींची प्रचार सभा असणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सांगलीत खासदार आणि बंडखोर नगरसेवकांमध्ये जुंपली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील आणि मिरजेतील भाजपाचे बंडखोर नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपलीय...दोन वेळा संधी दिलेल्या बाजार बुणग्यांना आता ठेचायची वेळ आलीय...तसेच उद्याच्या राजकारणात त्यांना  घरी बसल्याशिवाय स्वस्थ बसणार  नाही...असा इशारा खासदार संजयकाका पाटलांनी दिलाय...तर कुठला नेता आला आणि आम्हाला पाडायचं म्हटलं तर त्याच्या बाप जन्मी जमणार नाही...असं आव्हान  बंडखोर माजी नगरसेवक सुरेश आवटींनी दिलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विकास गोगावलेंची अनंत गीतेंवर बोचरी टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : रायगडचे मविआ उमेदवार अनंत गीते यांच्यावर टीका करताना आमदार भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंची जिभ घसरलीय. गीतेंना कानाखाली वाजवण्याची भाषा गोगावलेंनी केलीय. महापूर, अतिवृष्टी यावरुन प्रश्न विचारले असता गीते हसत होते असा आरोप करत विकास गोगावले आक्रमक झाले.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भारतात सेवा बंद करण्याचा व्हॉट्स अ‍ॅपचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Whats App : मेसेज एन्क्रिप्शन अर्थात गोपनीयता तोडण्यास बाध्य केलं तर भारतात सेवा देणं बंद करु असा पवित्रा व्हॉट्स अ‍ॅपनं दिल्ली कोर्टात घेतलाय. केंद्र सरकारच्या नव्या माहिती आणि तंत्रज्ञान धोरणाविरोधात व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टानं दिल्ली हायकोर्टाकडे हस्तांतरित केली. याच याचिकेसंबंधी सुनावणीदरम्यान व्हॉट्स अ‍ॅपनं भारतातून सेवा बंद करण्याचा इशारा दिलाय. नव्या आयटी नियमांमुळे ग्राहकांच्या खासगीपणाचा भंग होऊ शकतो असं व्हॉट्स अ‍ॅपचं म्हणणं आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नाशिकमध्ये कार आणि घोड्याचा अपघात, घोड्याचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Accident : नाशिकमध्ये कार आणि घोड्याचा अपघात झाल्याची घटना समोर आलीय...नाशिक शहरातील त्र्यंबक नाका सिग्नल भागात ही घटना घडलीय...या अपघातात घोड्याचा मृत्यू झालाय...कारने धडक दिल्याने भरदुपारी उन्हामध्ये हा घोडा डांबरी रस्त्यावर तडफडत पडला होता...घोड्याचा छातीचा भाग फुटल्याने रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडला होता...अखेर घोड्याचा मृत्यू झाला...सारंखेडातून या घोड्याची खरेदी पाच लाखात करण्यात आली होती. पांढराशुभ्र आणि चपळ असलेल्या या घोड्याचा जीव नाहक अपघातामध्ये रस्त्यावर गेलाय...जिल्ह्यात आणि शहरात अपघातामध्ये सर्वसामान्य माणसेच नाही तर पाळीव प्राणीही असुरक्षित झाले आहेत...या घटनेचा तपास सुरू असून, अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • लातूरमध्ये प्रियंका गांधींची प्रचारसभा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur Priyanka Gandhi : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींची आज लातूरच्या उदगीरमध्ये सभा होणार आहे... काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगेंसाठी दुपारी 3 वाजता सभा होणार आहे...एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सातत्याने विजयी होत आहेत. यावेळी अमित देशमुखांनीही लातूरचा गड राखण्यासाठी जोर लावलाय...काळगेंसमोर महायुतीच्या सुधाकर शृंगारेंचं आव्हान आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अमेठीसाठी काँग्रेसनं कंबर कसली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amethi Rahul Gandhi : राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झालंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधी अमेठीत 5 दिवस मुक्काम करणार आहेत. यादरम्यान पक्षाकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत.. काही ठिकाणी रोड शो आणि काही ठिकाणी सभांचं नियोजन असेल. राहुल गांधींच्या प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी ब्लॉक अध्यक्षांना देण्यात आलीय. 5 विधानसभा आणि 130 पंचायत समिती सदस्यांना काँग्रेसकडून सक्रिय केलं जाणार आहे. प्रत्येक बूथसाठी एकूण 10 सदस्यांची टीम बनवली गेलीय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • देवेंद्र फडणवीसांची आज सांगलीत प्रचारसभा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangli Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीत सभा घेणार आहेत. सांगलीचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. दुपारी 2 वाजता कडेगाव इथे ही सभा होणार आहे. संजयकाका पाटील यांची लढत मविआचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्याशी होणार आहे...त्यामुळे संजयकाका पाटलांसाठी फडणवीस मैदानात उतरलेयत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शरद पवार आज सातारा दौऱ्यावर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Satara Sharad Pawar : शरद पवार आज सातारा दौ-यावर आहेत.. सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या दोन सभा आहेत.. दहीवडी इथे माढा उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटलांच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता पवारांची सभा होतेय.. तर 3 वाजता पाटण इथे लोकसभा उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार सभा घेणार आहेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पंतप्रधान मोदींची कोल्हापुरात प्रचारसभा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान मोदींची तब्बल 10 वर्षांनंतर कोल्हापुरात तपोवन मैदानावर सभा होतेय.. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 5 वाजता ही सभा होतेय.. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या सभेमुळे महायुतीच्या प्रचारात रंगत येणार आहे.. मोदी विरुद्ध गादी अशा पद्धतीनं कोल्हापुरात प्रचार सुरु आहे. भाजपचा एकही खासदार आणि आमदार नसलेल्या जिल्ह्यात पंतप्रधान सभा घेत असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link