मुरूड जंजीरा किल्ला पहायला जायचा प्लान करत असाल तर अजिबात करु नका; तिकडे जाऊन परत यावे लागेल
मुरूड जंजीरा किल्ला पहायला जाण्याचा बेत आखणाऱ्यांसाठी एक बॅड न्यूज आहे. यामुळे प्लान करण्याआधी ही फोटो स्टोरी नक्की पाहा.
Murud Janjira Fort : रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजीरा किल्ला हा महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, आता मुरूड जंजीरा किल्ला पहायला जायचा प्लान चुकूनही करु नका. जरी तुम्ही तिकडे गेला तरी तुम्हाला किल्ला न पाहता परत यावे लागले.