Paresh Rawal Net Worth : एकेकाळी गर्लफ्रेंडकडून पैसे घ्यायचे परेश रावल, आज इतक्या संपत्तीचे आहेत मालक

Paresh Rawal Net Worth : बॉलिवूड अभिनेता परेश रावल यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. बँकेची नोकरी सोडून त्यांनी अभिनयाची वाट निवडली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील रंजक गोष्टी. 

May 30, 2024, 09:39 AM IST
1/7

30 मे 1950 मध्ये परेश रावल यांचा जन्म मुंबईत झाला. सिव्हिल इंजिनिअर असूनही नोकरीसाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. 

2/7

अथक परिश्रमानंतर त्यांना बँक ऑफ बडोदामध्ये काम मिळालं. दीड महिन्यासाठी या बँकेत त्यांना नोकरी मिळाली होती. पण त्यांनी ती नोकरी तीन दिवसांमध्ये सोडली. अशा परिस्थितीत त्यांची मैत्रणी स्वरुपा संपत त्यांना पैशांची मदत करायची. हा किस्सा खुद्द परेश रावल यांनी एका शोमध्ये सांगितला होता. 

3/7

खूप कमी लोकांना माहितीय की परेश रावल यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीतून केलीय. त्यानंतर 1982 मध्ये 'नसीब नी बलिहारी' या गुजराती चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला तर 1984 मधील 'होली' या चित्रपटातून परेश रावल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

4/7

परेश रावल यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले असून त्यांनी गुजराती, हिंदी, तेलुगू आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केलंय. नायकापेक्षा खलनायकाच्या भूमिकेला परेश रावलला लोकप्रियता मिळाली लागली. त्यांना खरी प्रसिद्धी ही हेरा फेरी या चित्रपटातून मिळाली. 

5/7

परेश रावल यांना पैसे देणारी स्वरुप संपत ही त्यांच्या बॉसची मुलगी होती. एका मुलाखतीत परेश यांनी सांगितलं की, स्वरुपला पाहता क्षणीच ते तिच्या प्रेमात पडले होते. स्वरुपला पाहताच त्यांचा मित्र महेंद्र जोशी यांना तिच्याबद्दल सांगितलं. 

6/7

तर त्यांनी लगेचच परेश रावल यांनी कल्पना दिली की ती मुलगी ही बॉसची मुलगी आहे. आज ती बॉसची मुलगी त्यांची पत्नी आहे. स्वरुप संपत यादेखील एक अभिनेत्री आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. 

7/7

परेश रावल यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 240 हून अधिक चित्रपटात काम केलंय. ते एका चित्रपटासाठी जवळपास 5 कोटी मानधन घेतात. त्यांनी एकूण संपत्ती ही 93 कोटी एवढी आहे.