अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा बदला; शेजारच्या देशावर 'शी बॉम्ब' टाकतोय किम जोंग!

 उत्तर कोरिया दक्षिण कोरियावर 'शी बॉम्ब' ने हल्ला करत आहे. 

| May 29, 2024, 23:08 PM IST

North Korea drops trash balloons :  उत्तर कोरिया दक्षिण कोरिया यांच्यातील वैर जगजाहीर आहे. आतापर्यंत उत्तर कोरिया दक्षिण कोरियाला क्षेपणास्त्रे आणि अणुबॉम्बच्या धमक्या देत आहे. मात्र आता, उत्तर कोरियाने विचित्र पद्धतीन बदला घेण्यास सुरुवात केली आहे. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियात  घाण पसरवण्यास सुरुवात केली आहे. एअर बलूनच्या माध्यमातून कचरा फेकला जात आहे. 

1/7

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा नेहमीच चर्चेत असतो तो त्याच्या जगावेगळ्या आदेशांमुळे.  किम जोंग उन याने एक अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा आदेश जारी केला आहे. 

2/7

दक्षिण कोरियातील लष्कराने नागरीकांना या बॅगांना स्पर्श करु नये असे आवाहन केले आहे.  

3/7

 हवेत हे पाढऱ्या रंगाचे फुगे पाहून दक्षिण कोरियातील नागरीक भयभित झाले आहेत. 

4/7

कचऱ्याने भरलेल्या या बॅगा दक्षिण कोरियातील नागरी वस्तीत तसेच शेतांमध्ये फेकल्या जात आहेत. 

5/7

पांढऱ्या रंगाच्या फुगयांना बॅगा बांधण्यात आल्या आहेत. या बॅगांमध्ये कचरा भरलेला आहे. 

6/7

दक्षिण कोरियाच्या नऊपैकी आठ प्रांतांमध्ये कचऱ्याने भरलेले फुगे सापडले आहेत.  

7/7

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा शेजारच्या देशावर 'शी बॉम्ब' टाकत आहे.